पालिकेच्या खड्ड्यात चिमुरड्याचा गेला जीव
By Admin | Updated: January 1, 2017 16:09 IST2017-01-01T16:09:50+5:302017-01-01T16:09:50+5:30
चेंबूरमधल्या आर.सी. मार्गावर महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे एका चिमुकल्याचा हकनाक जीव गेला आहे.

पालिकेच्या खड्ड्यात चिमुरड्याचा गेला जीव
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 1 - चेंबूरमधल्या आर.सी. मार्गावर महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे एका चिमुकल्याचा हकनाक जीव गेला आहे. पालिकेकडून खोदण्यात आलेल्या ड्रेनेज लाईनच्या खड्ड्यात पडून अडीच वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सुफियान शेख असे या मुलाचे नाव असून तो गोवंडी शिवाजी नगर येथे राहणारा आहे. याबाबत चेंबूर पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.