महाड दुर्घटनेतील मृतदेह अरबी समुद्रात वाहून गेले ?
By Admin | Updated: August 4, 2016 10:54 IST2016-08-04T10:13:07+5:302016-08-04T10:54:57+5:30
महाड दुर्घटनेत सावित्र नदीमध्ये वाहून गेलेल्या वाहनांमधील मृतदेह सापडू लागले आहेत. गुरुवारी सकाळी तीन मृतदेह सापडले.

महाड दुर्घटनेतील मृतदेह अरबी समुद्रात वाहून गेले ?
ऑनलाइन लोकमत
पोलादपूर, दि. ४ - महाड दुर्घटनेत सावित्री नदीमध्ये वाहून गेलेल्या वाहनांमधील मृतदेह सापडू लागले आहेत. गुरुवारी सकाळी तीन मृतदेह सापडले असून, तीनही मृतदेह समुद्र किना-यावर सापडले आहेत. त्यामुळे प्रवाशांचे मृतदेह अरबी समुद्रात वाहून गेल्याची दाट शक्यता आहे.
सर्वप्रथम जयगड-मुंबई एसटीबसचे चालक एस.एस.कांबळे यांचा मृतदेह दापोलीतील आंर्जेले समुद्र किना-यावर सापडला. घटनास्थळापासून ७० किमी अंतरावर त्यांचा मृतदेह सापडला. त्यानंतर हरीहरेश्वर येथील समुद्र किना-यावर एका वृद्धेचा मृतदेह सापडला.
आणखी वाचा
घटनास्थळापासून ८९ किमी अंतरावर दुसरा मृतदेह सापडला. तिसरा मृतदेह महाड जवळच्या केंबुर्ली गावा जवळच्या समुद्रात सापडला. या मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम पोलिस करीत आहेत.