शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

नागपूरातील आमदार निवासात आढळला मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2018 12:12 AM

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची धावपळ सुरू असताना येथील आमदार निवासात एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने सर्वत्र प्रचंड खळबळ उडाली आहे. विनोद अग्रवाल (वय ५०) असे मृताचे नाव असून ते आकोट येथील रहिवासी होते.

नागपूर : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची धावपळ सुरू असताना येथील आमदार निवासात एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने सर्वत्र प्रचंड खळबळ उडाली आहे. विनोद अग्रवाल (वय ५०) असे मृताचे नाव असून ते आकोट येथील रहिवासी होते.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील अंधेरी पूर्व मतदारसंघातील शिवसेना आमदार रमेश लटके यांचे स्वीय सहायक संदीप वरकडे यांच्यासोबत सोमवारी अग्रवाल नागपुरात आले होते. आमदार निवासातील ४६ क्रमांकाच्या खोलीत ते सोमवारी रात्री झोपायला गेले.सकाळी वरकडे तेथे आले. प्रतिसाद देऊनही कडी न उघडल्याने त्यांनी बाजूला असलेल्या खिडकीतून बघितले असता अग्रवाल अर्धे कॉटवर तर अर्धे खाली लोंबकळल्यासारखे पडून दिसले. त्यांनी लगेच पोलिसांना कळवले. सीताबर्डीचे ठाणेदार हेमंतकुमार खराबे ताफ्यासह तेथे पोहोचले. दाराला धक्का मारून आत प्रवेश केल्यावर अग्रवाल मृतावस्थेत आढळून आले.हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज डॉक्टरांनी वर्तविला आहे. मात्र नेमके कारण स्पष्ट न झाल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे़

टॅग्स :nagpurनागपूर