कर्जतमध्ये आढळले मृतदेह

By Admin | Updated: April 29, 2016 03:40 IST2016-04-29T03:40:10+5:302016-04-29T03:40:10+5:30

कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी दोन बेवारस मृतदेह आढळले आहेत.

The bodies found in Karjat | कर्जतमध्ये आढळले मृतदेह

कर्जतमध्ये आढळले मृतदेह

कर्जत : कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी दोन बेवारस मृतदेह आढळले आहेत. याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून त्याची नोंद करण्यात आली आहे.
कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेल्वे स्टेशनच्या पार्र्किं गलगत एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला. या इसमाचा चेहरा एका बाजूला खराब झाला आहेत. याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. याबाबत पोलीस हवालदार जी.एल. पाटील हे पुढील तपास करीत आहेत.
तर दहिवली येथील विसर्जन घाटालगत गुरुवारी सकाळी उल्हास नदीच्या पात्रात एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला आहे. या इसमाचे अंदाजे वय ३५ वर्षाचे आहे. हा इसम नदीच्या पात्रात आंघोळीसाठी उतरला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. (वार्ताहर)

Web Title: The bodies found in Karjat