पुण्यात बसच्या धडकेत मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचा मृतदेह पाऊणतास रस्त्यावरच पडून
By Admin | Updated: April 18, 2016 15:52 IST2016-04-18T13:59:26+5:302016-04-18T15:52:23+5:30
सिंहगड रोडवरील राजाराम पुलाजवळ महापालिकेच्या बसने दिलेल्या धडकेत तरुणीचा मृत्यू झाला आहे

पुण्यात बसच्या धडकेत मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचा मृतदेह पाऊणतास रस्त्यावरच पडून
>ऑनलाइन लोकमत -
पुणे, दि. १८ - सिंहगड रोडवरील राजाराम पुलाजवळ महापालिकेच्या बसने दिलेल्या धडकेत तरुणीचा मृत्यू झाला आहे. तरुणी दुचाकीवरुन जात असताना बसने दिलेल्या धडकेत तिचा जागीच मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या या तरुणीचा मृतदेह मात्र पाऊणतास रस्त्यावर तसाच पडून होता. या घटनेमुळे पालिकेच्या असंवेदनशील कारभारावर टीका होऊ लागली आहे.
मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचं नाव सुप्रिया आहे. सुप्रिया सिंहगड रोडकडून पुण्याच्या दिशेने जात होती. त्यावेळी पाठीमागून येणाऱ्या पीएमपीएमएल बसने सुप्रियाला धडक दिली. सुप्रियाने हॅल्मेट घातले होते पण बसचं पुढचं चाक तिच्या डोक्यावरुन गेल्यामुळे सुप्रियाचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर सिंहगड रस्त्यावर वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी झाली होती. अपघातानंतर सुप्रियाचा मृतदेह पाऊणतास रस्त्यावर तसाच पडून होता. पाऊणतासानंतर अखेर मृतदेह उचलण्यासाठी रुग्णवाहिका आली.