ऊसदर नियामक मंडळाची गुरुवारी बैठक
By Admin | Updated: November 9, 2014 02:12 IST2014-11-09T02:12:33+5:302014-11-09T02:12:33+5:30
ऊसदर नियामक मंडळास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी उशिरा मान्यता दिली. या निर्णयामुळे ऊसदराचा प्रश्न लवकर निकालात निघण्यास मदत होणार आहे.
ऊसदर नियामक मंडळाची गुरुवारी बैठक
कोल्हापूर : ऊसदर नियामक मंडळास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी उशिरा मान्यता दिली. या निर्णयामुळे ऊसदराचा प्रश्न लवकर निकालात निघण्यास मदत होणार आहे. पहिल्या उचलीबाबत नूतन नियामक मंडळाची पहिली बैठक 13 नोव्हेंबरला मुंबईत होण्याची शक्यता आहे.
दरवर्षी ऊसदरासाठी होणारे आंदोलन व त्यातून होणारे कारखान्यांसह शेतक:यांचे नुकसान टाळण्यासाठी वीज नियामक मंडळाच्या धर्तीवर ऊसदर नियामक मंडळाचा प्रस्ताव राज्यशासनाच्या विचारधीन होता. आघाडी सरकारने याचा मसुदा तयारही केला होता; पण त्याला गती आली नव्हती. भाजपा2ारकार सत्तेवर येताच नियामक मंडळ स्थापनेचा निर्णय घेतला. सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी नियामक मंडळाची रचना निश्चित केली. यामध्ये विक्रमसिंह घाटगे, खासदार राजू शेट्टी, रघुनाथ पाटील यांच्यासह बाराजणांचा समावेश करण्यात आला.
नियामक मंडळाचा प्रस्ताव मंत्री पाटील यांनी काल अंतिम मंजुरीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठविला होता. मुख्यमंत्री फडणवीस यांनी काल उशिरा ऊसदर
नियामक मंडळाला मान्यता दिली. शनिवारी व रविवारी सुटी असल्याने याबाबतचा अधिकृत शासकीय अध्यादेश सोमवारी प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर पुढील प्रक्रिया
गती घेणार आहे. नियामक मंडळाच्या सदस्यांची ऊसदराबाबत पहिली बैठक गुरुवारी होणार असल्याचे सूत्रंनी सांगितले. त्यामुळे येत्या आठ-दहा दिवसांत पहिल्या उचलीचा प्रश्न निकालात निघण्याची दाट शक्यता आहे. (प्रतिनिधी)
साखर कामगारांचे आंदोलन स्थगित
वेतनवाढ व सेवाशर्ती देण्याबाबत राज्यातील साखर कामगारांनी बेमुदत काम बंदचा निर्णय जाहीर केला होता. यासाठी कामगारांनी ऑगस्ट महिन्यात मोठा मोर्चा काढून सरकारला इशारा दिला होता. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाच्या पदाधिका:यांनी चर्चा केली. यावेळी त्यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली असल्याने ‘काम बंद’चे आंदोलन पंधरा दिवसांसाठी स्थगित करीत असल्याची माहिती राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे उपाध्यक्ष राऊसाहेब पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिली.
मराठवाडय़ात पीक, पाणी परिस्थिती गंभीर
औरंगाबाद : मराठवाडय़ात पिकांसह पिण्याच्या पाण्याची अवस्थाही गंभीर बनत चालली आहे. जिल्हानिहाय परिस्थितीचा आढावा घेण्याचे काम शासनाकडून सुरू असून, केंद्रीय कृषिमंत्र्यांनाही यासंदर्भात सविस्तर माहिती देण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे दिली.
अवघ्या दीड तासाच्या दौ:यात मुख्यमंत्र्यांनी भाजपा महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या मुलीच्या लग्न समारंभाच्या पूर्वसंध्येला शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणो सिडको एन-3 येथे आचार्य रत्नसुंदरसुरीश्वरजी यांची भेट घेतली. तत्पूर्वी, विमानतळावर पत्रकारांशी चर्चा करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, दुष्काळ परिस्थितीसाठी शासन सर्वतोपरी उपाययोजना करणार आहे. मराठवाडय़ात परिस्थिती गंभीर बनत चालली असून, विभागीय स्तरावर आढावा घेण्यात येत असून, शासनाकडे यासंबंधीचा सविस्तर अहवाल लवकरच येईल. केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन यांच्याकडेही सविस्तर माहिती देण्यात आली आहे.