BMC ELECTION RESULTS : 690 कोटींची संपत्ती असलेल्या पराग शहांचा विजय
By Admin | Updated: February 23, 2017 15:56 IST2017-02-23T12:35:11+5:302017-02-23T15:56:00+5:30
मुंबई महापालिका निवडणुकीतील सर्वात श्रीमंत उमेदवार पराग शहा यांनी घाटकोपरच्या वॉर्ड 132 मधून विजय मिळवला आहे.

BMC ELECTION RESULTS : 690 कोटींची संपत्ती असलेल्या पराग शहांचा विजय
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 23 - मुंबई महापालिका निवडणुकीतील सर्वात श्रीमंत उमेदवार पराग शहा यांनी घाटकोपरच्या वॉर्ड 132 मधून विजय मिळवला आहे. त्यांनी काँग्रेस उमेदवार प्रविण छेडा यांच्यावर 2803 मतांनी विजय मिळवला. उमेदवारी अर्ज दाखल करताना पराग शहा यांनी 690 कोटींची संपत्ती जाहीर केली होती.
पेशाने बांधकाम व्यावसायिक असलेले पराग शहा 47 वर्षांचे आहेत. पराग शहा राज्यसरकारमधील मंत्री प्रकाश मेहता यांचे निकटवर्तीय आहेत. प्रविण छेडा अनेकवर्षांपासून नगरसेवक म्हणून इथून निवडून येत होते. त्यांची सद्दी शहा यांनी मोडून काढली. प्रविण छेडा यांच्यापासून आगामी विधानसभा निवडणुकीत धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे प्रकाश मेहता यांनी पराग शहांसारख आर्थिक संपन्नता असलेला उमेदवार पुढे केला अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती.
पराग शहा मुंबई जैन महासंघाचे अध्यक्ष आहेत. मागच्या 15 वर्षांपासून मी समाजसेवेमध्ये सक्रीय आहे. राजकीय व्यासपीठ मिळाल्यामुळे मला अधिक जोमाने समाजकार्य करता येईल असे पराग शहा यांनी म्हटले आहे.