BMC ELECTION RESULT : मुंबईत या दिग्गजांना मतदारांचा दे धक्का
By Admin | Updated: February 23, 2017 18:20 IST2017-02-23T16:52:02+5:302017-02-23T18:20:59+5:30
मुंबई महानगरपालिका निवडणुकीत तगड्या उमेदवारांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे.

BMC ELECTION RESULT : मुंबईत या दिग्गजांना मतदारांचा दे धक्का
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 23 - मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेनं मुसंडी मारल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेनेनंतर भाजपा दुसरा मोठा पक्ष असल्याचे पाहायला मिळत आहे.
तर निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससहीत मनसे भुईसपाट झाले आहेत. दरम्यान काही, तगड्या उमेदवारांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे.
पराभूत उमेदवार
यशोधर फणसे, शिवसेना (स्थायी समिती अध्यक्ष)
तृष्णा विश्वासराव,शिवसेना (सभागृह नेत्या)
स्वप्ना देशपांडे, मनसे (संदीप देशपाडे यांच्या पत्नी)
प्रवीण छेडा, काँग्रेस (विरोधी पक्षनेते)
देवेंद्र आंबेरकर, शिवसेना (माजी विरोधी पक्षनेता)
विनोद शेलार, भाजपा (आशिष शेलार यांचे बंधू)
कामिनी शेवाळे, शिवसेना (खासदार राहुल शेवाळे यांच्या पत्नी)
तेजस्विनी आंबोले, भाजपा (नाना आंबोले यांच्या पत्नी)
निकीता निकम, काँग्रेस (माजी विरोधी पक्षनेते ज्ञानराज निकम यांच्या कन्या)