BMC ELECTION RESULT - शिवसेनेचा सूर्य कधीच मावळणार नाही- संजय राऊत
By Admin | Updated: February 23, 2017 18:19 IST2017-02-23T17:35:28+5:302017-02-23T18:19:02+5:30
शिवसेनेचे खासदार आणि नेते संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

BMC ELECTION RESULT - शिवसेनेचा सूर्य कधीच मावळणार नाही- संजय राऊत
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 23 - मुंबई महापालिकेत शिवसेनेचाच वरचष्मा कायम राहणार असल्याचं चित्र स्पष्ट झाल्यानंतर शिवसेनेचे खासदार आणि नेते संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. शिवसेनेचा तळपता सूर्य हा कधीच मावळणार नाही, असंही संजय राऊत म्हणाले आहेत. मुंबई महापालिकेतील 227 जागांपैकी बहुतेक जागांचे निकाल हाती आले आहेत. शिवसेनेने तब्बल 90 जागांवर आघाडी घेतली असून, शिवसेनेला जवळपास 84 जागा मिळण्याचा अंदाज आहे.
भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेमधील संघर्षामुळे दोन्ही पक्षांसाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची झाली होती. मुंबई महापालिकेतील सत्तेचा राजदंड हा शिवसेनेच्याच हाती राहणार असल्याचे संजय राऊत म्हणाले आहेत. शिवसेना हा मुंबई महापालिका निवडणुकीत नंबर 1च्या पक्ष बनण्याच्या मार्गावर आहे. मात्र भाजपानंही 81 जागांवर मुसंडी मारत 4 अपक्ष आमदार आमच्यासोबत असल्याचं सांगत शिवसेनेवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न चालवला आहे.