BMC ELECTION RESULT - दादरचा बालेकिल्ला शिवसेनेनं केला सर, विशाखा राऊत विजयी
By Admin | Updated: February 23, 2017 18:19 IST2017-02-23T17:04:29+5:302017-02-23T18:19:41+5:30
मुंबईत महापालिका निवडणुकीत अटीतटीच्या लढतीत विशाखा राऊत यांनी मनसेच्या स्वप्ना देशपांडेंवर मात करत विजय मिळवला आहे.

BMC ELECTION RESULT - दादरचा बालेकिल्ला शिवसेनेनं केला सर, विशाखा राऊत विजयी
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 23 - मुंबईत महापालिका निवडणुकीत अटीतटीच्या लढतीत विशाखा राऊत यांनी मनसेच्या स्वप्ना देशपांडेंवर मात करत विजय मिळवला आहे. दादरचा बालेकिल्ला शिवसेनेनं मनसेकडून खेचून आणला आहे. मुंबई महापालिका निवडणुकांचे कल हाती येत असताना पहिल्या टप्प्यात मनसेचा हा गड भाजपा सर करते की काय, अशी भीती निर्माण झाली होती. मात्र मनसे, भाजपाला दणका देत शिवसेनेनं ही जागा पुन्हा मिळवली आहे.
दादरच्या वॉर्ड क्रमांक 191मधून मनसेकडून संदीप देशपांडे यांच्या पत्नी स्वप्ना देशपांडे यांना उमेदवारी जाहीर झाली होती. त्यानंतर मनसेनं ही जागा निवडून आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले होते. विशेष म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही सभा घेऊन स्वप्ना देशपांडेंना मतदान करण्याचं मतदारांना आवाहन केलं होतं.
अखेर मतदारांनी शिवसेनेला साथ देत विजयी केले आहे. विशाखा राऊत यांच्या विजयानंतर शिवसेनेनं दादरमध्ये जल्लोष साजरा केला आहे.