BMC ELECTION RESULT : शिवसेना-भाजपने एकत्र यावे - चंद्रकांत पाटील
By Admin | Updated: February 23, 2017 18:18 IST2017-02-23T17:38:28+5:302017-02-23T18:18:11+5:30
कटुता पुरे झाली, शिवसेना आणि भाजपाला मुंबईत एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही, असे विधान राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

BMC ELECTION RESULT : शिवसेना-भाजपने एकत्र यावे - चंद्रकांत पाटील
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 23 - कटुता पुरे झाली, शिवसेना आणि भाजपाला मुंबईत एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही, असे विधान राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.
चंद्रकांत पाटील यांच्या या विधानावरुन शिवसेना-भाजपा पुन्हा हातमिळवणी करू शकतात, असे संकेत मिळाले आहे. 'एबीपी माझा'शी बोलताना पाटील यांनी हे संकेत दिले आहेत.
'भाजपाला राज्यभरात भरघोस यश मिळाले. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस मोठे आहेत. ते दोघेही क्षुल्लक मुद्दे बाजूला ठेवून राज्यासाठी एकत्र येतील.महापालिकेत आम्ही सम-समान आहोत. त्यामुळे पारदर्शकता हा मुद्दा कायम ठेवून यापुढेही वाटचाल सुरु राहील', असंही पाटील म्हणाले आहेत.
शिवाय, शिवसेना-भाजपामधील समन्वयाचे काम आवडीने करेन, असेही सांगत चंद्रकांत पाटील यांनी मध्यस्थाची भूमिका निभवण्यास तयारीही दर्शवली आहे.