BMC ELECTION RESULT : राजने मागितली साथ जनतेने दिले सात
By Admin | Updated: February 23, 2017 23:50 IST2017-02-23T22:12:48+5:302017-02-23T23:50:15+5:30
मुंबई महापालिकेच्या निवडणूक प्रचारादरम्यान तुमच्या राजाला साथ द्या, अशी गाण्याद्वारे भावनिक साद घालणा-या मनसेला अवघ्या सातच जागांवर समाधान मानावे लागले.

BMC ELECTION RESULT : राजने मागितली साथ जनतेने दिले सात
>ऑनलाइन लोकमत़
मुंबई, दि. 23 - मुंबई महापालिकेच्या निवडणूक प्रचारादरम्यान तुमच्या राजाला साथ द्या, अशी गाण्याद्वारे भावनिक साद घालणा-या मनसेला अवघ्या सातच जागांवर समाधान मानावे लागले आहे.
मुंबई महापालिकेच्या गेल्या म्हणजेच 2012च्या निवडणुकीत 28 जागांवर कब्जा करणा-या आणि किंगमेकरच्या भूमिकेत असलेल्या राज ठाकरे यांच्या मनसेला 2017 च्या निवडणुकीत फक्त सातच जागांवर विजय मिळवता आला. विशेष म्हणजे या निवडणुकीत मनसेचे महापालिकेतील गटनेते संदीप देशपांडे यांच्या पत्नीचाही पराभव झाला. तसेच, निवडणूक प्रचारादरम्यान ‘तुमच्या राजाला साथ द्या’ अशी भावनिक साद घालणाऱ्या गाण्याद्वारे निवडणूकीचा प्रचार करणाऱ्या मनसेला फक्त सातच जागा मिळाल्या. यात अश्विनी माटेकर, संजत तुर्डे, हर्षला मोरे, दत्ताराम नरवणकर, दिलीप लांडे, अर्चना भालेराव आणि परमेश्वर तुकाराम कदम अशी विजयी उमेदवारांची नावे आहेत.
दरम्यान, या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपाने बाजी मारली असून शिवसेनेला 84 जागा मिळाल्या आहेत, तर भाजपाला 82 जागा मिळाव्या आहेत.