बीएमसी निवडणूक:कॉंग्रेसला मोठा धक्का, आंबेरकरांचा आज शिवसेना प्रवेश
By Admin | Updated: January 29, 2017 07:33 IST2017-01-29T07:33:34+5:302017-01-29T07:33:34+5:30
मुंबई महानगर पालिकेचे माजी विरोधीपक्ष नेते आणि काँग्रेसचे प्रभाग क्र. 57चे नगरसेवक देवेंद्र(बाळा)आंबेरकर आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

बीएमसी निवडणूक:कॉंग्रेसला मोठा धक्का, आंबेरकरांचा आज शिवसेना प्रवेश
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 29 - मुंबई महानगर पालिकेचे माजी विरोधीपक्ष नेते आणि काँग्रेसचे प्रभाग क्र. 57चे नगरसेवक देवेंद्र(बाळा)आंबेरकर आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
काँगेसचे सरचिटणीस गुरुदास कामत यांचे ते कट्टर समर्थक मानले जातात. कामत यांनी दोन दिवसांपूर्वी संजय निरुपम यांच्या मनमानी कारभारावर जाहीरपणे टीका केली होती. शिवसेना प्रऴेशानंतर आंबेरकर प्रभाग क्र 68 मधून निवडणुक लढवणार असल्याचं सांगितलं जात आहे. सकाळी 11.30 वाजता आंबेरकर शिवसेनेत प्रवेश करतूल यावेळी विभागप्रमुख व आमदार डॉ.अनिल परब,खासदार गाजनन कीर्तिकर,स्थायी समिती अध्यक्ष यशोधर(शैलेश)फ़णसे आणि आदी उपस्थित राहणार आहेत.