BMC ELECTION - आमिर खान, अक्षय कुमारने मतदानाकडे फिरवली पाठ
By Admin | Updated: February 22, 2017 12:43 IST2017-02-22T10:53:41+5:302017-02-22T12:43:22+5:30
बॉलिवूडच्या आघाडीच्या नायकांनी प्रत्यक्षात मतदानाचा हक्कच बजावला नसल्याचे समोर आले आहे. मुंबईत बॉलिवूड सेलिब्रिटींची निवासस्थाने आहेत.

BMC ELECTION - आमिर खान, अक्षय कुमारने मतदानाकडे फिरवली पाठ
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 22 - सोशल मिडियावरुन सामाजिक विषयांवर आपण किती संवेदनशील आहोत हे दाखवून देणा-या बॉलिवूडच्या आघाडीच्या नायकांनी प्रत्यक्षात मतदानाचा हक्कच बजावला नसल्याचे समोर आले आहे. मुंबईत बॉलिवूड सेलिब्रिटींची निवासस्थाने आहेत. पण मंगळवारी मुंबईत पार पडलेल्या महापालिका निवडणुकीसाठी फार कमी सेलिब्रिटींनी मतदानाचा हक्क बजावला.
मतदान न करणा-यांमध्ये आमिर खान, अक्षय कुमार या दोघांचा समावेश आहे. हे दोन्ही कलाकार नेहमीच सामाजिक प्रश्नांवर सोशल मिडियामधून आपली भूमिका मांडतात पण प्रत्यक्षात यांनीच मतदानाचा आपला हक्क बजावला नाही. अक्षयचे नाव मुंबईच्या मतदार यादीत आहे कि, नाही हे समजलेले नाही.
पण अजय देवगन, आमिर खान, हृतिक रोशन, अनुपम खेर, ऋषि कपूर, जावेद अख्तर आणि शबाना आझमी, अर्जुन कपूर, संजय दत्त, इमरान हाश्मी, दिया मिर्जा, कंगना राणौत, प्रियंका चोप्रा, सैफ अली खान यांनी मतदान केले नाही.
अजय देवगन व इमरान हाश्मी जोधपूरमध्ये आहेत. आमिर खान व हृतिक रोशन बाहेरगावी आहेत. ऋषि कपूर हांगकांगमध्ये आहेत. जावेद अख्तर व शबाना आझमी बेंगलुरूमध्ये आहेत, अर्जुन कपूर लंडनमध्ये, संजय दत्त आग्रात, सैफ अली खान व कंगना राणौत दिल्लीत, अक्षय कुमार भोपाळमध्ये तर प्रियांका चोप्रा अमेरिकेत आपल्या कामात व्यस्त आहे.