BMC Election 2017-काँग्रेसला काँग्रेस नेत्यांनीच हरवलं- निरुपम
By Admin | Updated: February 21, 2017 20:00 IST2017-02-21T19:54:54+5:302017-02-21T20:00:36+5:30
काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी स्वपक्षीयांवरच हल्लाबोल केला आहे.

BMC Election 2017-काँग्रेसला काँग्रेस नेत्यांनीच हरवलं- निरुपम
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 21 - काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी स्वपक्षीयांवरच हल्लाबोल केला आहे. माझ्या पराभवासाठी पक्षातूनच प्रयत्न करण्यात आले होते. मला हरवण्यासाठी काँग्रेस नेते राबल्याचा गंभीर आरोप संजय निरुपम यांनी स्वपक्षीयांवर केला आहे. इंडिया टुडे आणि अॅक्सिस माय इंडियाच्या सर्वेक्षणानुसार काँग्रेस तिस-या क्रमांकावर राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आल्यानंतर संजय निरुपम एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.
त्यावेळी त्यांनी मला हरवण्यासाठी पक्षातूनच प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला आहे. पक्षविरोधी काम करणा-यांची नावं दिल्लीला सुद्धा ठाऊक आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी मला चांगलं सहकार्य केलं आहे, असंही ते म्हणाले आहेत.
(मुंबई महापालिका निवडणुकीच्या अधिक बातम्या वाचवण्यासाठी क्लिक करा: BMC Election 2017)
तसेच शिवसेना नंबर 1 वरच राहील हेही त्यांनी मान्य केले असून, भाजपाला मात्र एवढ्या जागा मिळणार नसल्याचे सूतोवाच त्यांनी केले आहेत. भाजपाला मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मोठा फायदा होणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.