BMC,बेस्ट कर्मचाऱ्यांना दिवाळीची खुशखबर

By Admin | Updated: October 24, 2016 20:20 IST2016-10-24T20:19:57+5:302016-10-24T20:20:15+5:30

मुंबई महापालिकेतील कर्मचाऱ्यासाठी खुशखबर आहे. पालिका कर्मचाऱ्यांना14 हजार रुपये तर बेस्टच्या कर्मचाऱ्यांना पाच हजार पाचशे रुपयांचा दिवाशी बोनस मिळणार आहे

BMC, Diwali Good News for Best Workers | BMC,बेस्ट कर्मचाऱ्यांना दिवाळीची खुशखबर

BMC,बेस्ट कर्मचाऱ्यांना दिवाळीची खुशखबर

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 24 - मुंबई महापालिकेतील कर्मचाऱ्यासाठी खुशखबर आहे. पालिका कर्मचाऱ्यांना14 हजार रुपये तर बेस्टच्या कर्मचाऱ्यांना पाच हजार पाचशे रुपयांचा दिवाशी बोनस मिळणार आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा बेस्ट कर्मचाऱ्यांचा बोनस 500 रुपयांनी वाढवण्यात आला आहे. याचा फायदा 45 हजार कर्मचाऱ्यांना होणार आहे. मुंबईच्या महापौर स्नेहा मोरे यांनी ही घोषणा केली आहे. आज महापालिकेच्या गटनेत्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

1 लाख 9 हजार पालिका कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस मिळणार आहे. याशिवाय पालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही गेल्या वर्षीपेक्षा 500 रुपयांनी जास्त बोनस दिला जाणार आहे. दिवाळीच्या या बोनसमुळे 154,69 कोटी रुपयांचा आर्थिक बोजा महापिलकेवर पडणार आहे.

 

Web Title: BMC, Diwali Good News for Best Workers