पिंपरीत राजकीय वैमनस्यातून भाजपा कार्यकर्त्याचा निर्घृण खून

By Admin | Updated: April 23, 2017 11:27 IST2017-04-23T10:59:58+5:302017-04-23T11:27:54+5:30

पिंपरी चिंचवड येथे राजकीय वैमनस्यातून भाजपा कार्यकर्त्याचा निर्घृण खून करण्यात आला आहे.

The bloodless BJP worker from the political vanity in the Pimp | पिंपरीत राजकीय वैमनस्यातून भाजपा कार्यकर्त्याचा निर्घृण खून

पिंपरीत राजकीय वैमनस्यातून भाजपा कार्यकर्त्याचा निर्घृण खून

ऑनलाइन लोकमत

तळेगाव दाभाडे, दि . 23 - राजकीय वैमनस्यातून सांगवडे येथे सरपंच दिपाली लिमण यांचे पती व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते नवनाथ अर्जुन लिमण (वय32, रा.सांगवडे,ता.मावळ) यांचा मध्यरात्री बाराच्या सुमारास पाच-सहा हल्लेखोरांनी कोयत्याने वार करून निर्घृण खून केला. या घटनेमुळे मावळ तालुक्यात खळबळ उडाली आहे.

सांगवडे येथे गावात रात्री अखंड हरिनाम सप्ताहाचे कीर्तन सेवा चालू होती. त्याच वेळी पाच -सहा जणांच्या टोळक्याने सांगवडे येथील ग्रामदेवता मंदिराच्या समोर नवनाथ यांच्यावर कोयत्याने वार केले. गंभीर जखमी झाल्याने त्यात ते जागीच ठार झाले. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी योगेश गजानन राक्षे याला ताब्यात घेतले असून अन्य 5-6 आरोपी फरार आहेत.
पोलीस निरीक्षक मुगुट पाटील यांच्यासह
तळेगाव दाभाडे पोलीस फौज तातडीने घटनास्थळी दाखल झाली. सांगवडे गावात तणावपूर्ण शांतता असून परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणाखाली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: The bloodless BJP worker from the political vanity in the Pimp