मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाला टाळे ठोको आंदोलन
By Admin | Updated: July 22, 2016 16:41 IST2016-07-22T14:17:09+5:302016-07-22T16:41:35+5:30
मुंबई विद्यापीठाचे निकाल वेळेवर लागत नाहीत, आणि विद्यार्थ्यांना प्रचंड मनस्ताप होतो, या विरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आंदोलन केले आहे.

मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाला टाळे ठोको आंदोलन
ऑनलाइन लोकमत
मुंबई विद्यापीठाचे निकाल वेळेवर लागत नाहीत, आणि विद्यार्थ्यांना प्रचंड मनस्ताप होतो, या विरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आंदोलन केले आहे. विद्यापीठाच्या परीक्षा विभागाला टाळं ठोका असं आंदोलन आज अभाविपच्या कार्यकर्त्यांनी केले. विराट विद्यापीठ सैराट झालं, 160 वं वरीस धोक्याचं, परीक्षा विभाग नापास असे फलक झळकावत हे आंदोलन करण्यात आलं.
(या आंदोलनाची ही क्षणचित्रे... सगळी छायाचित्रे सुशील कदम)