हार्बर मार्गावर रविवारी ब्लॉक

By Admin | Updated: April 27, 2017 02:32 IST2017-04-27T02:32:03+5:302017-04-27T02:32:03+5:30

मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनकडून अंधेरी ते गोरेगावर हार्बर विस्तारीकरण केले जात आहे. या कामासाठी जोगेश्वरी स्थानकाच्या

Block on Harbor line on Sunday | हार्बर मार्गावर रविवारी ब्लॉक

हार्बर मार्गावर रविवारी ब्लॉक

मुंबई : मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनकडून अंधेरी ते गोरेगावर हार्बर विस्तारीकरण केले जात आहे. या कामासाठी जोगेश्वरी स्थानकाच्या डाउन धिम्या मार्गावर (बोरीवलीच्या दिशेने) ३० एप्रिल रोजी ९ तासांचा ब्लॉक घेण्यात येईल. हा ब्लॉक रविवारी सकाळी ७ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत चालेल. ब्लॉकदरम्यान राम मंदिर स्थानकात धिम्या लोकल गाड्यांना थांबा देण्यात येणार नाही.
१५ डबा लोकल, तसेच गोरेगाव लोकल वगळता, डहाणू रोड, विरार, वसई रोड, भार्इंदर, बोरीवली, मालाड ते अंधेरी, बोरीवलीदरम्यान सर्व डाउन जलद लोकलना ३० एप्रिल २०१७ ते ७ मे २०१७ पर्यंत जोगेश्वरीत अतिरिक्त थांबा मिळेल. तर धिम्या लोकलना जोगेश्वरी स्थानकात थांबा देण्यात येणार नाही. (प्रतिनिधी)

Web Title: Block on Harbor line on Sunday