नाटय संमेलनाच्या उद्घाटनाला गोंधळाचे गालबोट
By Admin | Updated: February 7, 2015 15:24 IST2015-02-07T13:06:58+5:302015-02-07T15:24:43+5:30
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांकडून निदर्शने करण्यात आल्याने ९५व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याला गोंधळाचे गालबोट लागले.

नाटय संमेलनाच्या उद्घाटनाला गोंधळाचे गालबोट
>ऑनलाइन लोकमत
बेळगाव, दि. ७ - महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांकडून निदर्शने करण्यात आल्याने ९५व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याला गोंधळाचे गालबोट लागले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन पार पडले. त्यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी बेळगाव, निपाणी कारवारसह संयुक्त महाराष्ट्र व्हायलाच पाहिजे अशा घोषणा दिल्याने काही काळ गोंधळाच वातावरण निर्माण झाले. त्यामुळे संमेलनाचे अध्यक्ष मोहन जोंशीनी व्यासपीठावरून खाली उतरून कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला खरा, मात्र तोपर्यंत उद्घाटन सोहळ्याला गालबोट लागलेच
'ज्ञानपीठ' पुरस्कार मिळाल्याबद्दल यावेळी शरद पवार यांनी भालचंद्र नेमाडेंचे अभिनंदन केले. प्रांतवादानंतरही बेळगावच्या जनतेची मराठीशी नाळ जुळलेली आहे, असेही ते म्हणाले.