‘आशीर्वाद’ 90 कोटींना

By Admin | Updated: July 26, 2014 02:15 IST2014-07-26T02:15:24+5:302014-07-26T02:15:24+5:30

बॉलिवूडचे सुपरस्टार दिवंगत राजेश खन्ना यांचा वांद्रे येथील कार्टर रोडवरील ‘आशीर्वाद’ बंगला शशी शेट्टी या व्यावसायिकाने 90 कोटींना खरेदी केल्याची माहिती सूत्रंकडून देण्यात येते.

'Blessings' 90 crores | ‘आशीर्वाद’ 90 कोटींना

‘आशीर्वाद’ 90 कोटींना

मुंबई : बॉलिवूडचे  सुपरस्टार दिवंगत राजेश खन्ना यांचा वांद्रे येथील कार्टर रोडवरील ‘आशीर्वाद’ बंगला शशी शेट्टी या व्यावसायिकाने 90 कोटींना खरेदी केल्याची माहिती सूत्रंकडून देण्यात येते. 6क्3 चौरस मीटरचा आकाराच्या या बंगल्याच्या खरेदीबाबत अद्याप शेट्टी यांनी कोणतेही वक्तव्य केलेले नसून खन्ना कुटुंबियांनीही याबाबत बोलण्यास नकार दिला आहे. सूत्रंच्या म्हणण्यानुसार हा व्यवहार 14 दिवसांच्या आत पूर्ण होणार आहे.
राजेश खन्ना यांनी आपल्या आयुष्यातील शेवटची दोन वर्षे याच बंगल्यात घालवली होती. त्यांनी हा बंगला अभिनेते राजेंद्र कुमार यांच्याकडून त्यावेळी 3.5 लाख इतक्या किंमतीला विकत घेतला होता. खन्ना यांचे वैभव अनुभवलेल्या या बंगल्याची खरेदी मुंबईतील व्यावसायिक शशी किरण शेट्टी यांनी केली आहे.
राजेश खन्ना यांच्या मृत्यूनंतर त्यांची निकटवर्तिय अनिता अडवानी आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यात त्यांच्या मालमत्तेवरून वाद निर्माण झाला. या बंगल्याची मालकी दुस:याकडे जाणार असली, तरी त्यांच्या आठवणी अजरामर आहेत. राजेश खन्ना यांचे खरे नाव जतिन चुन्नीलाल खन्ना असे होते. गेल्या शुक्रवारी त्यांच्या दुस:या स्मृतीदिनी त्यांचे कुटुंबीय, निकटवर्तीय आणि चाहत्यांनी त्यांना श्रध्दांजली वाहिली.(प्रतिनिधी)
 
खन्नांची इच्छा अपूर्ण
राजेश खन्ना यांनी आपल्या एका मुलाखतीत आशीर्वाद बंगल्याचे रुपांतर ‘राजेश खन्ना म्युङिायम’मध्ये करावे, अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यांनी म्हटले होते की, माङया मुलींकडे त्यांची स्वत:ची घरे आहेत. त्यांना माङया संपत्तीची गरज नाही. मात्र अखेरचा निर्णय त्यांनाच घ्यावा लागणार आहे, कारण माझी सगळी संपत्ती ही त्यांच्याकडे राहाणार आहे.

 

Web Title: 'Blessings' 90 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.