शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

भुजबळ आहेत तेथेच खूश आहेत - संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2019 04:37 IST

संजय राऊत : आर्थिक मंदीला भाजपच जबाबदार

नाशिक : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी स्वत:च ते जेथे आहेत तेथे खूष असल्याचे म्हटले आहे. पक्ष प्रवेशाच्या अफवांवर विश्वास ठेवू नका, असे त्यांनी स्वत:च जाहीर केले आहे. अशा परिस्थितीत त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याच्या भावना व मतांचा आदर राखला जावा, असे स्पष्ट मत शिवसेनेचे प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. मात्र भुजबळ हे शिवसेनेत प्रवेश करतील किंवा नाही याविषयी राऊत यांनी थेट भाष्य करणे टाळले आहे.

खासदार संजय राऊत दोन दिवसांच्या नाशिक भेटीवर आले असून, उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी मत व्यक्तकेले. ते म्हणाले, देश आर्थिक कोंडीत सापडला असून, मंदीमुळे बेरोजगारीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. तीन वर्षांपूर्वीच्या नोटाबंदी व त्यापाठोपाठच्या जीएसटी लागू करण्याला शिवसेनेचा विरोध होता. त्यामुळे आता आलेल्या आर्थिक मंदीला भाजपच जबाबदार असल्याचे स्पष्ट मत शिवसेनेचे प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले. शिवसेना सत्तेत असली तरी, धोरणात्मक निर्णय घ्यायचा शिवसेनेला अधिकार नाही, असा निर्वाळाही त्यांनी दिला.माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी साडेतीन वर्षांपूर्वीच देशाच्या अर्थव्यवस्थेविषयी भाकीत केले होते. ते आता खरे वाटू लागले असून, आॅटोमोबाइल, टेक्सटाइल, फार्मास्युटिकल, बांधकाम अशा अनेक क्षेत्रात मंदीचे सावट निर्माण झाले आहे. रोजगाराचा प्रश्न आवासून उभा आहे. त्यामुळे सरकारने परिस्थिती सावरण्यासाठी लवकर पावले उचलणे गरजेचे आहे. तसे न झाल्यास सरकारने घेतलेले ३७० कलम रद्द करण्याचा तसेच राम मंदिरासारख्या प्रश्नांवरील निर्णयांना काही अर्थ राहणार नाही. या प्रश्नांपेक्षा लोकांना पोटाचा प्रश्न महत्त्वाचा वाटतो, अशी पृष्टीही त्यांनी जोडली. शिवसेना सत्तेत सहभागी असली तरी, आमचा एकच मंत्री आहे. देशाची धोरणे पंतप्रधान, अर्थमंत्री, गृहमंत्री, संरक्षणमंत्री, मनुष्यबळ विकासमंत्री ठरवित असतात. त्यामुळे देशापुढे निर्माण झालेल्या आर्थिक परिस्थितीशी शिवसेनेचा संबंध नाही, त्यासाठी भाजपच जबाबदार असल्याचे खासदार राऊत म्हणाले. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतChhagan Bhujbalछगन भुजबळShiv Senaशिवसेना