काळबादेवी आगीच्या चौकशी अहवालात ठपका
By Admin | Updated: June 3, 2015 03:46 IST2015-06-03T03:46:21+5:302015-06-03T03:46:21+5:30
अत्यावश्यक सेवा असलेल्या अग्निशमन दल व आपत्ती व्यवस्थापन कक्षातील अपुऱ्या मनुष्यबळाचा फटका काळबादेवी येथील भीषण

काळबादेवी आगीच्या चौकशी अहवालात ठपका
मुंबई : अत्यावश्यक सेवा असलेल्या अग्निशमन दल व आपत्ती व्यवस्थापन कक्षातील अपुऱ्या मनुष्यबळाचा फटका काळबादेवी येथील भीषण आगीच्या मदतकार्याला बसल्याचा ठपका पालिकेच्या चौकशी समितीने ठेवला आहे़ अग्निशमन दलाचे वरिष्ठ अधिकारी रजेवर, स्थानिक साहाय्यक आयुक्तांचा घटनास्थळी लेट मार्क, नियंत्रण कक्षातून तत्काळ प्रतिसाद मिळण्यास विलंबामुळे बचावकार्यातील महत्त्वाचा तास (गोल्डन अवर्स) वाया गेल्याच्या गंभीर बाबी या समितीने निदर्शनास आणल्या आहेत़
काळबादेवी येथील गोकूळ निवासला लागलेल्या आगीत अग्निशमन दलाचे चार वरिष्ठ अधिकारी मृत्युमुखी पडले़ या प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमलेल्या विशेष समितीने तीन आठवड्यांनंतर आपला अहवाल आयुक्त अजय मेहता यांना आज सादर केला़ ३१ पानांच्या या अहवालातून जुन्या इमारतींच्या सुरक्षमधील त्रुटी दाखवून उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत़ अतिरिक्त आयुक्त डॉ़ संजय मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या अहवालातून अग्निशमन दलातील बेशिस्तीवर बोट ठेवले आहे़ असमन्वयामुळे मोठ्या आगी हातळण्यास अत्यावश्यक सेवा असमर्थता असल्याचा सूर या अहवालातून लावण्यात आला आहे.