चिंचपोकळीजवळ रिकाम्या एक्स्प्रेसचा डबा घसरला
By Admin | Updated: October 18, 2016 14:14 IST2016-10-18T13:47:20+5:302016-10-18T14:14:29+5:30
दादरहून-सीएसटीच्या दिशेने जाणा-या रिकाम्या एक्स्प्रेसचा डबा घसरल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

चिंचपोकळीजवळ रिकाम्या एक्स्प्रेसचा डबा घसरला
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १८ - दादरहून-सीएसटीच्या दिशेने जाणा-या रिकाम्या एक्स्प्रेसचा लोकलचा डबा घसरल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मंगळवारी दुपारी चिंचपोकळी यार्डाजवळ ही दुर्घटना घडली. मात्र लोकल रिकामी असल्याने सुदैवाने कोणीही जखमी झालेले नाही. ही बातमी समजताच रेल्वे अधिकारी व कर्मचा-यांनी घटनास्थळी धाव घेतली.
दरम्यान रुळांवरून घसरलेला डबा हटवण्यात आला असून रेल्वे वाहतूक पूर्ववत सुरू झाली असली तरीही गाडया १० -१५ मिनिटे उशीराने धावत आहेत.