शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
13
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
14
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
15
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
16
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
17
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
18
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
20
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"

ब्ल्यू व्हेलचा वाढता विळखा...24 तासात दोघांची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 5:59 PM

ब्ल्यू व्हेल गेमच्या आहारी गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांची  24 तासात सुटका करण्यात आली असून, त्यामधील एकाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

ठळक मुद्दे14 वर्षीय मुलगा टास्क पुर्ण करण्यासाठी घर सोडून पुण्याला पोहोचला, पोलिसांनी केली सुटका इंदूरमध्ये शाळकरी मुलाचा शाळेच्या इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न जगभरात ब्ल्यू व्हेलच्या नादाला लागून जवळपास 100 जणांची आत्महत्या

मुंबई, दि. 11 - अंधेरीतील 14 वर्षीय अल्पवयीन मुलाने आत्महत्या केल्यानंतर 'ब्ल्यू व्हेल' ऑनलाइन गेमचा मुद्दा चर्चेला आला असून विळखा वाढत चालला असल्याचं दिसत आहे. ब्ल्यू व्हेल गेमच्या आहारी गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांची  24 तासात सुटका करण्यात आली असून, त्यामधील एकाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुदैवाने दोघांनाही वाचवण्यात यश मिळालं आहे. मात्र यामुळे ब्ल्यू व्हेलचा धोका अजूनही कमी झाला नसल्याचं स्पष्ट झालं आहे. 

मध्य प्रदेशातील शाळेत आत्महत्या करत होता विद्यार्थीमध्य प्रदेशातील इंदुर शहरात एका विद्यार्थ्यानं ब्ल्यू व्हेल गेमच्या आहारी जाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 'ब्लू व्हेल'चा अंतिम म्हणजेच 50वा टप्पा पार करण्यासाठी या विद्यार्थ्यानं शाळा इमारतीच्या तिस-या मजल्यावर उडी मारण्याचा प्रयत्न केला. सुदैवानं यावेळी शिक्षकानं या मुलाला पाहिलं व लगेचच त्याला आत्महत्या करण्यापासून रोखले. यामुळे त्या मुलाचा जीव वाचू शकला.  राजेंद्र नगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चमेली देव शाळेमध्ये इयत्ता सातवीमध्ये शिकणा-या विद्यार्थी 'ब्लू व्हेल चॅलेंज'मधील 50वा टप्पा पूर्ण करण्यासाठी  शाळा इमारतीच्या तिस-या मजल्यावरुन उडी मारत होता. त्यानं उडी मारल्यास 2 कोटी रुपये मिळणार असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र सतर्क शिक्षकाने या मुलाचा 'ब्ल्यू व्हेल गेम'मुळे बळी जाण्यापासून बचावले आहे.

‘ब्ल्यू व्हेल गेम’च्या नादात घर सोडून पुण्याला ‘ब्ल्यू व्हेल गेम’चा टास्क पूर्ण करण्याच्या नादात सोलापूर येथील १४ वर्षीय किशोरवयीन मुलगा पुण्याच्या दिशेने जात होता. हे लक्षात येताच सोलापूर पोलिसांनी भिगवण पोलिसांना संपर्क साधून भिगवण पोलीस ठाण्याचे पोलीस एन. एम. राठोड यांनी तातडीने कार्यवाही केली. त्यामुळे भिगवण बसस्थानकात मुलाला ताब्यात घेण्यात आले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला, असे असले तरी ‘ब्लू व्हेल’सारख्या जीवघेण्या मोबाईल गेमचे लोण आता ग्रामीण भागात पोहोचले आहे. त्यामुळे पालकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

अंधेरीतील मुलाचा ब्ल्यू व्हेलमुळे बळीमुंबईमधील अंधेरी येथे राहणा-या 14 वर्षीय मुलाने ब्ल्यू व्हेल गेमच्या आहारी जाऊन आत्महत्या केल्याचा अंदाज आहे. या मुलाला ब्ल्यू व्हेल या ऑनलाइन गेमचे व्यसन जडले होते. रशिया आणि अन्य देशांमध्येही काही जणांना या गेमच्या नादात आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. शेजारच्या इमारतीत राहणा-या लोकांनी या मुलाला इमारतीच्या गच्चीवर पाहिले होते. त्यावेळी तो स्वत:चा सेल्फी व्हिडीओ काढताना दिसत होता. अंधेरी पोलिसांनी या घटनेची अपघाती मृत्यू अशी नोंद केली आहे. 

ब्ल्यू व्हेल, हा गेम नक्की आहे काय?

या गेममध्ये एकदा प्रवेश केला की खेळणारा मरेर्पयत काही त्यातून बाहेर पडू शकत नाही. हा ब्ल्यू व्हेल म्हणजे एक वेगवेगळे टास्क देणारा अ‍ॅडमिनिस्ट्रेटर. तो ऑर्डर देणारा व्यक्ती अज्ञात असतो, गेममधला अदृश्य कुणी. एकदा या खेळात लॉग इन केलं की तो वेगवेगळ्य़ा आज्ञा देतो. खेळायचं तर आज्ञा पालन करणं आलंच. साधारणत: 50 प्रकारच्या आज्ञांचे टप्पे मुलांना ओलांडावे लागतात. या टप्प्याची प्रगती सोप्यापासून अवघड लेव्हलच्या दिशेनं होते.  शेवटी खेळणार्‍याला आत्महत्या करण्याचं आव्हान दिलं जातं. काही शूरवीर आपलं जीवन खेळण्याच्या नादात संपवतातही! या गेममध्ये होतं काय की  सुरुवातीला रात्री-अपरात्री उठणं, हॉरर सिनेमे एकटय़ानं पाहणे वगैरे टप्पे दिले जातात. नंतर मात्र स्वतःला इजा करुन घेणं, ब्लेडने कापून घेणं असे किळसवाणे आणि धोकादायक प्रकार करवून घेतले जातात.

सरते शेवटी चक्क आत्महत्या करण्याची ऑर्डर दिली जाते, सर्वात धक्कादायक बाब म्हणजे काही मुलांनी हे टप्पे पार करुन आत्महत्या केल्याही. युलिया, कोन्स्टान्टिनोव्हा आणि व्हेरोनिका वोल्वोवा या दोन तरुण मुलींनी इमारतीवरुन उड्या मारल्यानंतर रशियन पोलीस एकदम सतर्क झाले. आपल्या देशात तरुणांच्या जीवाशी एक गेम खरंच खेळ करत आहे हे त्यांच्या लक्षात आलं. मग ब्लू व्हेलचा तपास सुरु झाला आहे. आतार्पयत शंभराहून अधिक आत्महत्या या खेळामुळे झाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

पालकांनो हे कराच -मुले कोणता गेम खेळतात, याकडे लक्ष द्या.त्यांच्याशी संवाद साधा, समजून घ्या.मुला-मुलींना ओरडण्यापेक्षा त्यांच्यासोबत वेळ घालवा.मित्र-मैत्रिणींच्या दबावाखाली कोणतीही गोष्ट करण्यापासून रोखा.चांगले आणि वाईट काय, हे त्यांच्या वयाचे होऊन समजेल अशा भाषेत सांगा.सोशल मीडियापासून दूर ठेवण्यासाठी मैदानी खेळ, एकत्रित सहल, गेट-टुगेदर अशा गोष्टी करा.