शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

अवनीच्या शिकारीमध्ये हलगर्जीपणा, एनटीसीच्या अहवालात ठपका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2018 13:58 IST

कथित नरभक्षक वाघीण अवनी हिची शिकार करण्यात आल्यानंतर वादाला तोंड फुटले होते. दरम्यान, अवनीच्या शिकारीच्या वेळी हलगर्जीपणा झाला असल्याचा ठपका एनटीसीच्या अहवालात ठेवण्यात आला आहे.

ठळक मुद्देकथित नरभक्षक वाघीण अवनी हिची शिकार करण्यात आल्यानंतर वादाला तोंड फुटले होते.अवनीच्या शिकारीच्या वेळी हलगर्जीपणा झाला असल्याचा ठपका एनटीसीच्या अहवालात ठेवण्यात आला आहे

नागपूर - कथित नरभक्षक वाघीण अवनी हिची शिकार करण्यात आल्यानंतर वादाला तोंड फुटले होते. दरम्यान, अवनीच्या शिकारीच्या वेळी हलगर्जीपणा झाला असल्याचा ठपका एनटीसीच्या अहवालात ठेवण्यात आला आहे. ढिसाळ नियोजन आणि हलगर्जीपणा यामुळे अखेरीस अवनीला ठार मारावे लागले असे या अहवालात म्हटले होते.13 जणांचा बळी घेतल्याचा संशय असलेल्या अवनी वाघिणीला अनेक दिवसांच्या शोधमोहिमेनंतर ठार मारण्यात आले होते. अवनीला ठार केल्यानंतर स्थानिक लोकांनी समाधान व्यक्त केले असले तरी प्राणीप्रेमी, विविध सामाजिक संघटना आणि विरोध पक्षांनी सरकारवर टीकेची झोड उठवली होती. दरम्यान, नॅशनल टायगर कन्झर्वेशन अॅथॉरिटीच्या अहवालामध्येही अवनीच्या मृत्यूला नियोजनातील ढिसाळपणा कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. अवनीला पकडण्यासाठी डॉ. कडू. यांनी दिलेला डार्ट 24 तासांत वापरणे आवश्यक होते. मात्र ते 56 तासांनंतर वापरण्यात आले. त्यामुळे अवनी बेशुद्ध झाली नाही. अखेरीस तिला गोळ्या घातून ठार करावे लागले असे या अहवालात म्हटले आहे. अवनीला ठार मारल्याप्रकरणी शार्प शूटर नवाब शहाफत अली खान यांच्यावरही आरोप झाले होते. मात्र  आम्ही शिकारी असलो तरी आम्हालाही वन्यजीवांचे प्रेम आहे. १३ शेतकरी, शेतमजुरांचा बळी घेणा-या नरभक्षक वाघीण अवनीलाही जीवाने मारायचे नव्हतेच. तिला बेशुद्ध करण्यासाठी अनेक महिने वाट पाहिली, संधी शोधली. त्या रात्रीही बेशुद्धीचा प्रयत्न झाला. मात्र तिने थेट झडप घातल्याने आमच्या सोबतच्या इतरांचे संरक्षण करण्यासाठी नाईलाजाने तिच्यावर गोळी झाडावी लागली, अशी स्पष्टोक्ती हैदराबाद येथील शार्प शूटर नवाब शहाफत अली खान यांनी काही दिवसांपूर्वी  दिली होती.  

टॅग्स :Avani Tigressअवनी वाघीणMaharashtraमहाराष्ट्र