भुजबळ कुटुंबीयांवर ठपका!

By Admin | Updated: March 24, 2015 02:38 IST2015-03-24T02:38:16+5:302015-03-24T02:38:16+5:30

विशेष तपासी पथकाच्या (एसआयटी) तपासात राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या कुटुंबीयांवर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी)ने ठपका ठेवला आहे.

Blame Bhujbal family! | भुजबळ कुटुंबीयांवर ठपका!

भुजबळ कुटुंबीयांवर ठपका!

महाराष्ट्र सदन घोटाळा : ‘ईडी’ला आढळले आरोपांत तथ्य
डिप्पी वांकाणी - मुंबई
नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनाच्या पुनर्बांधणीच्या कामातील कथित घोटाळ््याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने नेमलेल्या विशेष तपासी पथकाच्या (एसआयटी) तपासात राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या कुटुंबीयांवर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी)ने ठपका ठेवला आहे.
आम आदमी पार्टीच्या महाराष्ट्रातील माजी निमंत्रक अंजली दमानिया यांनी केलेल्या जनहित याचिकेत मुंबई उच्च न्यायालयाने ‘ईडी’ व महाराष्ट्र सरकारचा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) यांचे एकत्रित तपासी पथक नेमून तपास करण्याचा व या तपासाचा अंतरिम अहवाल सादर करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला होता. त्यानुसार ‘ईडी’ने सीलबंद लखोट्यात न्यायालयात सादर केलेल्या तपासी अहवालात भुजबळ कुटुंबीयांवर ठपका ठेवला असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.
भेटायला तुरुंगात जावे लागेल!
न्यायालयात याप्रकरणी उद्या, मंगळवारी मुख्य न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे सुनावणी व्हायची असून, न्यायालय पुढे काय निर्देश देते याविषयी उत्सुकता आहे. या संदर्भात ‘भुजबळांना भेटायला आता तुरुंगात जावे लागेल!’ हे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी पुण्यात केलेले विधान सूचक मानले जात आहे.

आडमार्गाने पैसे घेतल्याचे उघड
‘ईडी’च्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ला सांगितले, की महाराष्ट्र सदनाचे काम मिळविण्यास भुजबळ यांचे कुटुंबीय संचालक असलेल्या कंपन्यांना आडमार्गाने लाच म्हणून पैसे देण्यात आल्याचे जनहित याचिकेतील आरोपांत काही अंशी तथ्य असल्याचे तपासात आढळले असून, आम्ही तसा अहवाल न्यायालयास दिला आहे. भुजबळ सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना महाराष्ट्र सदनाचे कंत्राट दिले होते. हा तपास न्यायालयाच्या देखरेखीखाली होत असल्याने नाव उघड करण्यास या अधिकाऱ्याने नकार दिला.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सोमवारी देविशा इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. या कंपनीचे संचालक राजेश माधव धरप यांची चौकशी केली. चौकशीनंतर त्यांचा जबाबही नोंदवून घेण्यात आला.

अधिकारी म्हणतात...
च्भुजबळ यांचा मुलगा पंकज आणि पुतण्या समीर प्रवेश कन्स्ट्रक्शन प्रा. लि. या कंपनीचे संचालक होते. त्यांनी ६५ कोटी रुपये उभे करण्यासाठी कंपनीचे प्रत्येकी १०० रुपये दर्शनी मूल्याचे शेअर्स ९,९०० रुपयांच्या आधिक्याने (प्रीमियम) विकले होते.
च्पंकज व समीर हे आर्मस्ट्राँग एनर्जी प्रा. लि. या कंपनीचेही संचालक आहेत. हे दोघे ६० कोटी रुपयांचा समाधानकारक खुलासा करू शकले नाहीत.
च्महाराष्ट्र सदनाचे काम ज्यांना मिळाले होते, त्यांनी दिलेले पैसे प्रवेश कन्स्ट्रक्शन कंपनीचे शेअर बनावट कंपन्यांनी विकत घेतल्याचे दाखवून आर्मस्ट्राँग कंपनीत वळविले गेले होते, असा आम्हाला संशय आहे.

Web Title: Blame Bhujbal family!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.