शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

'Blackout' crisis in Maharashtra: महाराष्ट्रावर वीजसंकट! कोळशाअभावी १३ वीजनिर्मिती संच बंद; सणासुदीच्या काळात Load sheddingचे सावट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 7:36 AM

'Blackout' crisis in India, 'Blackout' crisis in Maharashtra: एकीकडे देशभरात निर्माण झालेली कोळसा टंचाई आणि  त्यामुळे निर्माण झालेले वीजनिर्मितीचे संकट ताजे असतानाच महाराष्ट्रातही ऐन सणासुदीच्या तोंडावर वीजसंकट गडद होण्याची चिन्हे आहेत.

मुंबई : एकीकडे देशभरात निर्माण झालेली कोळसा टंचाई आणि  त्यामुळे निर्माण झालेले वीजनिर्मितीचे संकट ताजे असतानाच महाराष्ट्रातही ऐन सणासुदीच्या तोंडावर वीजसंकट गडद होण्याची चिन्हे आहेत. महावितरणला वीजपुरवठा करणाऱ्या विविध औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांतील १३ संच कोळशाअभावी सध्या बंद पडल्याने तब्बल ३३३० मेगावॅट विजेचा पुरवठा ठप्प झाला असून राज्यात लोडशेडिंगची शक्यता निर्माण झाली आहे. संचबंदीमुळे निर्माण झालेली विजेची तूट भरून काढण्यासाठी वीजखरेदीसह जलविद्युत व अन्य स्रोतांकडून वीजपुरवठा उपलब्ध करण्याचे प्रयत्न महावितरणतर्फे सुरू करण्यात आले असून खुल्या बाजारातून महागड्या दराने खरेदी करावी लागत आहे.वीज खरेदीचे दर महागदेशभरात विजेची मागणी वाढल्यामुळे वीज खरेदीचे दर महाग होत आहेत. खुल्या बाजारातून ७०० मेगावॅट विजेची खरेदी १३ रुपये ६० पैसे प्रतियुनिट दराने करण्यात येत आहे. तर रविवारी सकाळी रियल टाइम व्यवहारातून ९०० मेगावॅट विजेची ६ रुपये २३ पैसे प्रतियुनिट दराने खरेदी करण्यात आली. यासोबतच कोयना धरण तसेच इतर लघु जलविद्युत निर्मिती केंद्रे आणि अपारंपरिक ऊर्जास्रोतांद्वारे वीज उपलब्ध करण्यात येत आहे. ...तर भारनियमन अटळअतिवृष्टी झाल्याने कोळशांच्या खाणींमधून कोळसा पुरवण्यात अडचणी येत आहेत. मात्र यावरही तोडगा काढला जाईल, असे केंद्र सरकार सातत्याने सांगत आहे. मात्र येत्या चार ते पाच दिवसांत परिस्थिती सुधारली नाही तर मात्र राज्यभरात भारनियमन होण्याची शक्यता आहे, अशी माहिती वीज क्षेत्रातील तज्ज्ञ प्रताप होगाडे  यांनी दिली.

महावितरणची उपाययोजनासकाळी ६ ते १० व सायंकाळी ६ ते रात्री १० पर्यंत विजेचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन ग्राहकांना केले आहे.विजेची मागणी व उपलब्धता यामधील सध्या ३३३० मेगावॅटची तूट भरून काढण्यासाठी खुल्या बाजारातून वीज खरेदी सुरू आहे.भारनियमन टाळण्यासाठी कृषी वाहिन्यांवर दररोज ८ तास दिवसा किंवा रात्री चक्राकार पद्धतीने थ्री फेज वीजपुरवठा करण्यात येत आहे. 

‘ऑक्टोबर हीट’मुळे मागणी वाढलीऑक्टोबर महिन्यात उष्मा वाढल्याने विजेची मागणीही वाढली आहे. मुंबई वगळून राज्यात शनिवारी १७,२८९ मेगावॅट विजेच्या मागणीप्रमाणे महावितरणकडून पुरवठा करण्यात आला. -रविवारी सकाळी ११.३० वाजता राज्यात १८,२०० मेगावॅट तर  महावितरणच्या कार्यक्षेत्रात १५,८०० मेगावॅट विजेची मागणी होती. 

वीजसंकटाची भीती निराधार : केंद्रीय ऊर्जामंत्रीघटत चाललेल्या कोळशाच्या साठ्यामुळे उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांनी केंद्र सरकारकडे चिंता व्यक्त केली. परंतु यामुळे वीजसंकट निर्माण होण्याची शक्यता केंद्र सरकारने फेटाळून लावली आहे. केंद्रीय ऊर्जामंत्री आर. के. सिंह म्हणाले की, ही शक्यता निराधार आहे, वीजसंकट कधीही नव्हते आणि कधीही येणारही नाही.    

टॅग्स :electricityवीजMaharashtraमहाराष्ट्र