'Blackout' crisis in Maharashtra: महाराष्ट्रावर वीजसंकट! कोळशाअभावी १३ वीजनिर्मिती संच बंद; सणासुदीच्या काळात Load sheddingचे सावट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 07:36 AM2021-10-11T07:36:10+5:302021-10-11T07:43:50+5:30

'Blackout' crisis in India, 'Blackout' crisis in Maharashtra: एकीकडे देशभरात निर्माण झालेली कोळसा टंचाई आणि  त्यामुळे निर्माण झालेले वीजनिर्मितीचे संकट ताजे असतानाच महाराष्ट्रातही ऐन सणासुदीच्या तोंडावर वीजसंकट गडद होण्याची चिन्हे आहेत.

'Blackout' crisis in Maharashtra! fear of Load shedding during the festive season | 'Blackout' crisis in Maharashtra: महाराष्ट्रावर वीजसंकट! कोळशाअभावी १३ वीजनिर्मिती संच बंद; सणासुदीच्या काळात Load sheddingचे सावट

'Blackout' crisis in Maharashtra: महाराष्ट्रावर वीजसंकट! कोळशाअभावी १३ वीजनिर्मिती संच बंद; सणासुदीच्या काळात Load sheddingचे सावट

Next

मुंबई : एकीकडे देशभरात निर्माण झालेली कोळसा टंचाई आणि  त्यामुळे निर्माण झालेले वीजनिर्मितीचे संकट ताजे असतानाच महाराष्ट्रातही ऐन सणासुदीच्या तोंडावर वीजसंकट गडद होण्याची चिन्हे आहेत. महावितरणला वीजपुरवठा करणाऱ्या विविध औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांतील १३ संच कोळशाअभावी सध्या बंद पडल्याने तब्बल ३३३० मेगावॅट विजेचा पुरवठा ठप्प झाला असून राज्यात लोडशेडिंगची शक्यता निर्माण झाली आहे. 
संचबंदीमुळे निर्माण झालेली विजेची तूट भरून काढण्यासाठी वीजखरेदीसह जलविद्युत व अन्य स्रोतांकडून वीजपुरवठा उपलब्ध करण्याचे प्रयत्न महावितरणतर्फे सुरू करण्यात आले असून खुल्या बाजारातून महागड्या दराने खरेदी करावी लागत आहे.
वीज खरेदीचे दर महाग
देशभरात विजेची मागणी वाढल्यामुळे वीज खरेदीचे दर महाग होत आहेत. खुल्या बाजारातून ७०० मेगावॅट विजेची खरेदी १३ रुपये ६० पैसे प्रतियुनिट दराने करण्यात येत आहे. तर रविवारी सकाळी रियल टाइम व्यवहारातून ९०० मेगावॅट विजेची ६ रुपये २३ पैसे प्रतियुनिट दराने खरेदी करण्यात आली. यासोबतच कोयना धरण तसेच इतर लघु जलविद्युत निर्मिती केंद्रे आणि अपारंपरिक ऊर्जास्रोतांद्वारे वीज उपलब्ध करण्यात येत आहे. 
...तर भारनियमन अटळ
अतिवृष्टी झाल्याने कोळशांच्या खाणींमधून कोळसा पुरवण्यात अडचणी येत आहेत. मात्र यावरही तोडगा काढला जाईल, असे केंद्र सरकार सातत्याने सांगत आहे. मात्र येत्या चार ते पाच दिवसांत परिस्थिती सुधारली नाही तर मात्र राज्यभरात भारनियमन होण्याची शक्यता आहे, अशी माहिती वीज क्षेत्रातील तज्ज्ञ प्रताप होगाडे  यांनी दिली.

महावितरणची उपाययोजना
सकाळी ६ ते १० व सायंकाळी ६ ते रात्री १० पर्यंत विजेचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन ग्राहकांना केले आहे.
विजेची मागणी व उपलब्धता यामधील सध्या ३३३० मेगावॅटची तूट भरून काढण्यासाठी खुल्या बाजारातून वीज खरेदी सुरू आहे.
भारनियमन टाळण्यासाठी कृषी वाहिन्यांवर दररोज ८ तास दिवसा किंवा रात्री चक्राकार पद्धतीने थ्री फेज वीजपुरवठा करण्यात येत आहे. 

‘ऑक्टोबर हीट’मुळे मागणी वाढली
ऑक्टोबर महिन्यात उष्मा वाढल्याने विजेची मागणीही वाढली आहे. मुंबई वगळून राज्यात शनिवारी १७,२८९ मेगावॅट विजेच्या 
मागणीप्रमाणे महावितरणकडून पुरवठा करण्यात आला. 
-रविवारी सकाळी ११.३० वाजता राज्यात १८,२०० मेगावॅट तर  महावितरणच्या कार्यक्षेत्रात १५,८०० मेगावॅट विजेची मागणी होती. 

वीजसंकटाची भीती निराधार : केंद्रीय ऊर्जामंत्री
घटत चाललेल्या कोळशाच्या साठ्यामुळे उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांनी केंद्र सरकारकडे चिंता व्यक्त केली. परंतु यामुळे वीजसंकट निर्माण होण्याची शक्यता केंद्र सरकारने फेटाळून लावली आहे. केंद्रीय ऊर्जामंत्री आर. के. सिंह म्हणाले की, ही शक्यता निराधार आहे, वीजसंकट कधीही नव्हते आणि कधीही येणारही नाही.    

Web Title: 'Blackout' crisis in Maharashtra! fear of Load shedding during the festive season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.