शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ बिल्डरांना काळ्या यादीत टाका; स्थानिक स्वराज्य संस्थांना निर्देश, अधिकाऱ्यांना तंबी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 05:52 IST

न्यायालयाच्या आदेशाचे पालन न करणे, हा न्यायालयाचा अवमान समजला जाईल.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: इमारती बांधताना त्यात सेप्टिक टँक किंवा सांडपाणी प्रक्रिया सयंत्र न बसवणाऱ्या आणि आराखड्यानुसार बांधकाम न करणाऱ्या बिल्डर्सना भोगवटा प्रमाणपत्र (ओसी) देऊ नका. त्यांच्यावर कारवाई करा आणि त्यांना ब्लॅकलिस्ट करा, असे निर्देश उच्च न्यायालयाने राज्यातील महापालिका, नगरपालिका आणि ग्रामपंचायतींना सोमवारी दिले.

सेप्टिक टँक किंवा सांडपाणी प्रक्रिया सयंत्र न बसवणाऱ्यांना ‘बिल्डर’ म्हणता येत नाही. बदलापूरसारखी परिस्थिती राज्यात अनेक ठिकाणी आहे. आराखड्यानुसार बांधकाम न करताही ‘ओसी’ देण्यात आल्याचे आमच्या निदर्शनास आले तर आम्हीच बिल्डरला ब्लॅकलिस्ट करू आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करू, अशी तंबी न्या. रवींद्र घुगे आणि न्या. अभय मंत्री यांच्या खंडपीठाने दिली.

बदलापुरातील बेकायदा इमारतींमध्ये सेप्टिक टँक न बांधल्याने तेथील सांडपाणी प्रक्रिया न करताच उल्हास नदीमध्ये सोडण्यात येत आहे. हे सांडपाणी काही नागरी वसाहतींच्या परिसरात जात असल्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. तिची सुनावणी झाली. 

या प्रकाराला आळा घालण्यासाठी कोणती पावले उचलण्यात येणार आहेत, यासंदर्भातील कुळगाव - बदलापूर नगर पालिकेचे प्रतिज्ञापत्र म्हणजे न्यायालयाच्या डोळ्यांत केवळ धूळफेक करण्याचा प्रकार आहे, अशा कठोर शब्दांत न्यायालयाने पालिकेला सुनावले.

‘‘तुम्ही अशा बिल्डर्सना ब्लॅकलिस्ट करणार नाही. त्यांच्यावर कारवाई करणार नाही, अशी आम्हाला खात्री आहे. उपाययोजनांबाबत तुम्ही मोठमोठ्या वल्गना केल्यात. पण, न्यायालयाने तुमच्यावर विश्वास ठेवावा, असे आतापर्यंत  काहीही केले नाही. तुम्ही न्यायालयाला केवळ समजाविण्याचा प्रयत्न करत आहात. प्रत्यक्षात न्यायालयाच्या आदेशाची अंंमलबजावणी करणारी एकही उपाययोजना तुम्ही केलेली नाही”, असे खडे बोल न्यायालयाने पालिकेला सुनावले.

किती काळ लपंडाव खेळणार?

न्यायालयाच्या आदेशाचे पालन न करणे, हा न्यायालयाचा अवमान समजला जाईल. तुम्ही किती काळ लपंडाव खेळणार? न्यायालयाला किती काळ फसविणार?  अशा शब्दात न्यायालयाने पालिकेवर ताशेरे ओढले. पुढील सुनावणीला उच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या समिती सदस्यांना उपस्थित राहण्याचे निर्देश दिले.

English
हिंदी सारांश
Web Title : Blacklist builders lacking septic tanks: High Court orders action.

Web Summary : The High Court directed local bodies to blacklist builders failing to install septic tanks or follow construction plans. Non-compliant builders will face action, and officials risk penalties for overlooking violations, warned the court amidst concerns over untreated sewage polluting rivers.
टॅग्स :Mumbai High Courtमुंबई हायकोर्टMunicipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६