काळा पैश्यावाल्यांची दादागिरी, ४ पत्रकारांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2016 15:18 IST2016-11-14T15:18:24+5:302016-11-14T15:18:24+5:30

500 रुपयाच्या जुन्या नोटा घेऊन 400 रुपये तसेच दहा हजार रुपयांचे 8 हजार रुपये देणा-या काळा पैसाधारकांनी पत्रकारांना मारहाण केली.

Black money laundering, 4 journalists assault | काळा पैश्यावाल्यांची दादागिरी, ४ पत्रकारांना मारहाण

काळा पैश्यावाल्यांची दादागिरी, ४ पत्रकारांना मारहाण

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १४ -  विक्रोळी हरियाली व्हिलेज येथे काही दुकानदार 500 रुपयाच्या जुन्या नोटा घेऊन 400 रुपये तसेच दहा हजार रुपयांचे 8 हजार रुपये देत असल्याची माहिती पत्रकारांना मिळाली. या बातमीची शहानिशा करण्यासाठी काही पत्रकार तेथे पोहोचले असता रांगेतील लोकांना पैसे वाटप करत असल्याचे दिसून येताच त्यांनी याचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करताचा काळा पैसाधारकांनी त्यांना मारहाण केली. यामध्ये पत्रकार प्रशांत बढे, अमोल पेडणेकर आणि कॅमेरामन मयूर राणे , संतोश पांडे यांना हे जखमी झाले असून विक्रोळी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

Web Title: Black money laundering, 4 journalists assault