मॉर्निंग वॉकला गेलेल्या तीन मुलांवर काळाची झडप

By Admin | Updated: September 20, 2016 01:12 IST2016-09-20T01:12:13+5:302016-09-20T01:12:13+5:30

वाशिम जिल्ह्यातील घटना; बेदरकार वाहनचालकाने चिरडले

Black Flag on the three kids who had gone to Morning Walk | मॉर्निंग वॉकला गेलेल्या तीन मुलांवर काळाची झडप

मॉर्निंग वॉकला गेलेल्या तीन मुलांवर काळाची झडप

वाशिम, दि. १९- मॉनिर्ंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या तीन मुलांना बेदरकार वाहनचालकाने चिरडल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी रिसोड तालुक्यातील सवड गावात घडली. या भीषण अपघातात दोन मुले जागीच ठार झाली, तर एकाचा उपचारांसाठी नेत असताना मृत्यू झाला.
सवड येथील अंकील गौतम जाधव (१४), करण लक्ष्मण खांदळे (१३) व वैभव विश्‍वनाथ वाकळे (१३) हे तिघेही सकाळी पावणेसहा वाजताच्या सुमारास 'मॉनिर्ंग वॉक'साठी बाहेर पडले होते. रिसोड-वाशिम मार्गावर फिरत असताना त्यांना अज्ञात वाहनाने चिरडले. अपघातानंतर वाहनचालक फरार झाला असून पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
रिसोड मार्गावर वाहतूक किरकोळ असते. त्यामुळे वाशिममधीलही अनेक नागरिक या रस्त्यावरून रिठद गावापर्यंत मॉर्निंग वॉकसाठी जातात. सोमवारी अंकील, करण आणि वैभवच्या मात्र हा मॉर्निंग वॉक जीवावर बेतला.

Web Title: Black Flag on the three kids who had gone to Morning Walk