पैठण येथील संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी भाजपाचे तालुकाध्यक्ष तुषार पाटील शिसोदे
By Admin | Updated: July 12, 2016 20:34 IST2016-07-12T20:34:26+5:302016-07-12T20:34:26+5:30
पैठण येथील संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी भाजपाचे तालुकाध्यक्ष तुषार पाटील शिसोदे तर व्हाईस चेअरमनपदी भास्कर नाना राऊत यांची मंगळवारी निवड

पैठण येथील संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी भाजपाचे तालुकाध्यक्ष तुषार पाटील शिसोदे
ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 12 - पैठण येथील संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी भाजपाचे तालुकाध्यक्ष तुषार पाटील शिसोदे तर व्हाईस चेअरमनपदी भास्कर नाना राऊत यांची मंगळवारी निवड झाली. त्यांनी १२ विरुद्ध ९ मतांनी त्यांच्याच पॅनलच्या आप्पासाहेब पाटील व ज्ञानेश औटे यांचा त्यांनी पराभव केला. निवडणूक प्रक्रिया सुरू असताना व निवडणूक झाल्यानंतर उपस्थित शेतकरी व जमावाने माजी आमदार संजय वाघचौरे व कारखाना चालविण्यास घेतलेल्या सचिन घायाळ यांच्या विरोधात रोष व्यक्त करीत घोषणाबाजी केली. निवडणुकीनंतर आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी कारखान्यावर दगडफेक केली.