शहरं
Join us  
Trending Stories
1
"मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर मी मुंडन करेन, ४ जूनला एक्झिट पोल चुकीचे सिद्ध होतील"
2
पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार, बहुतांश एक्झिट पोलचा अंदाज
3
व्हॉट्सॲपवरून ट्रिपल तलाक; पतीवर गुन्हा, पत्नीला धमकावल्याचा आरोप 
4
धक्कादायक! ११ प्रवाशांनी भरलेली बोट नदीत उलटली; ७ जणांचा बुडून मृत्यू, ४ जण बचावले
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - २ जून २०२४; यश, प्रतिष्ठा वाढेल, वरिष्ठ खूश असल्याने पदोन्नतीची शक्यता
6
नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्मला महाराष्ट्राची अपेक्षित साथ नाही !
7
उत्तरेत पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजप पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा
8
पश्चिम बंगालमध्ये भाजप तृणमूलला देणार धक्का, २०१९च्या तुलनेत सरस कामगिरी करणार
9
हिटमॅनचा फॅन मैदानात शिरला! अमेरिकेच्या पोलिसांनी इंगा दाखवला; रोहितही अवाक्, Video
10
अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगचे इटलीत सेलिब्रेशन
11
पंतप्रधान मोदींची ४५ तास ध्यान साधना, संतकवी तिरुवल्लुवर यांना वाहिली पुष्पांजली
12
जावई-सासऱ्यातील समेटासाठी मुलाचा आधार, संवाद साधण्याचा उच्च न्यायालयाचा सल्ला 
13
आजही अडचणींचा डोंगर, वेळेत काम पूर्ण करण्याचे नियोजन
14
एमएचटी-सीईटीच्या चुकीच्या उत्तरांची दखलच नाही, एक प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरील फॉर्म्युल्यावर आधारित 
15
भारतीय फलंदाजांनी निडरपणे खेळावे - सौरव गांगुली
16
स्कूलबसच्या अपघाताला शाळा संचालकही जबाबदार, पंजाब आणि हरयाणा हायकोर्टाने सुनावले
17
नेपाळ, नेदरलँड्स देऊ शकतात धक्का : गिलख्रिस्ट 
18
अकरावी प्रवेशासाठी ५ जूनपासून पसंतिक्रम, पहिल्याच फेरीचेच वेळापत्रक जाहीर
19
‘धूप से बचने के लिए टोपी तो दिजीए’, रणरणत्या उन्हात कामगार मेटाकुटीला
20
‘एअर टर्ब्युलन्स’ची माहिती मिळणार, प्रवासी सुरक्षेसाठी विशेष सॉफ्टवेअरची ‘इंडिगो’कडून चाचणी

भाजपाच्या ज्येष्ठ नगरसेविका शैलजा गिरकर यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2017 10:15 PM

भाजपा नगरसेविका शैलजा गिरकर यांचे आज (रविवार) निधन झाले. माजी उपमहापौर राहिलेल्या शैलजा गिरकर यांचं अल्पशा आजारानं निधन झालंय. वयाच्या 58व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शैलजा गिरकर कांदिवली पश्चिम मतदारसंघाचं भाजपाकडून प्रतिनिधित्व करत होत्या.

मुंबई, दि. 10 - भाजपा नगरसेविका शैलजा गिरकर यांचे आज (रविवार) निधन झाले. माजी उपमहापौर राहिलेल्या शैलजा गिरकर यांचं अल्पशा आजारानं निधन झालंय. वयाच्या 58व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शैलजा गिरकर कांदिवली पश्चिम मतदारसंघाचं भाजपाकडून प्रतिनिधित्व करत होत्या. 1997पासून आजपर्यंत जवळपास 20 वर्षं त्या नगरसेविका राहिल्या होत्या. चारकोपमधील वॉर्ड क्रमांक 21मधील नगरसेविका आणि आमदार विजय (भाई) गिरकर यांच्या त्या पत्नी होत. शैलजा गिरकर यांच्या जाण्यानं मुंबईत भाजपाचा एक नगरसेवक कमी झाला आहे.संसर्गजन्य तापामुळे त्यांनी शनिवारी सकाळी कांदिवली येथील ऑस्कर रुग्णालयात हलवण्यात आले. प्रकृती काहीशी सुधारत असतानाच त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. यावेळी त्यांचे पती माजी राज्यमंत्री भाई गिरकर व चार डॉक्टरही तेथे उपस्थित होते. हृदयविकाराचा धक्का एवढा तीव्र स्वरूपाचा होता की, त्यांचं तात्काळ निधन झालं. शैलजा गिरकर यांनी 2001 ते 2003 या कालावधीत मुंबईचे उपमहापौरपद भूषवले होते. महिला व बालकल्याण, स्थापत्य समिती अध्यक्षा म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. त्यांच्या पश्चात पती माजी राज्यमंत्री भाई गिरकर, एक मुलगा व एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. कांदिवली येथील डहाणूकरवाडी स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.