लाचखोरीत ‘भाजपा’चे लोकसेवक आघाडीवर
By Admin | Updated: February 4, 2015 02:25 IST2015-02-04T02:25:53+5:302015-02-04T02:25:53+5:30
आघाडी सरकारच्या विरोधात भ्रष्टाचाराची ओरड करत सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पार्टीचेच लोकसेवक लाच घेण्यात इतर राजकीय पक्षांपेक्षा पुढे असल्याचे दिसून आले आहे.

लाचखोरीत ‘भाजपा’चे लोकसेवक आघाडीवर
विश्वास पाटील ल्ल कोल्हापूर
आघाडी सरकारच्या विरोधात भ्रष्टाचाराची ओरड करत सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पार्टीचेच लोकसेवक लाच घेण्यात इतर राजकीय पक्षांपेक्षा पुढे असल्याचे दिसून आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गेल्या वर्षभरात १९ पदाधिकाऱ्यांना (‘इतर लोकसेवक’ या व्याख्येत मोडणारे) लाच घेताना घेताना पकडले. त्यामध्ये भाजपचे सर्वाधिक पाचजण आहेत. राष्ट्रवादीसह काँग्रेस व शिवसेनेच्याही प्रत्येकी तिघांनी लाच घेतली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, २०१४ या वर्षात १९ सरपंच-उपसरपंचांसह इतर १९ लोकसेवकांनी लाच घेतली. त्यामध्ये १२ महिला पदाधिकाऱ्यांचा समावेश आहेत.
कोल्हापूरच्या महापौर तृप्ती माळवी यांना ३० जानेवारीस सोळा हजारांची लाच घेताना पकडले.
त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या असल्याने शिवसेना व भाजपाने महापालिका बरखास्त करण्याची मागणी
केली आहे. परंतु, या
सध्याच्या सत्ताधारी पक्षांचे पायदेखील मातीचेच असल्याचे आकडेवारी सांगते.
तक्रारींमध्ये सातत्याने वाढ
भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये गेल्या चार वर्षांत दुप्पट वाढ झाली आहे. २०१० ला राज्यात ४८६ प्रकरणे झाली होती. २०१४ ला ही संख्या १२४५ वर गेली. गेल्या वर्षात ३ अध्यक्ष, ४ सभापती, १० नगरसेवक आणि १९ सरपंच-उपसरपंचांना लाच घेताना रंगेहात पकडले. पूर्वी लोक तक्रार देण्यास पुढे येत नव्हते. आता लोकजागृतीमुळे ते धाडसाने पुढे येत आहेत.
- लक्ष्मण जगदाळे, पोलीस निरीक्षक , लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई
लाचखोर ‘लोकसेवकां’ची पक्षनिहाय संख्या
भाजप : ०५
राष्ट्रवादी : ०३
काँग्रेस : ०३
शिवसेना : ०३
शेकाप : ०१
मनसे : ०१
अपक्ष (स्थानिक पक्ष) : ०२
इतर : ०१
इतर लोकसेवक म्हणजे कोण?
जे लोक शासकीय सेवांचा लाभ घेतात व मानधनही स्वीकारतात, अशांना ‘इतर लोकसेवक’ असे म्हटले जाते. त्यांनी प्रत्यक्ष, सरकारी स्वीय सहायक अथवा खासगी व्यक्तीमार्फत लाच घेतली तरी त्यांच्यांवर कारवाई होऊ शकते. कोल्हापूरच्या महापौरांवर याच तरतुदीन्वये कारवाई झाली आहे.