सेनेला नमविण्याचे भाजपाचे दबावतंत्र
By Admin | Updated: October 26, 2014 14:53 IST2014-10-26T02:30:23+5:302014-10-26T14:53:47+5:30
नव्या सरकारच्या शपथविधीचा मुहूर्त समिप येऊन ठेपला तरी शिवसेनेसोबतच्या चर्चेची कोंडी कायम ठेऊन भाजपाने दबावतंत्रचा अवलंब केला आहे.

सेनेला नमविण्याचे भाजपाचे दबावतंत्र
शिवसेनेविना शपथविधी ? : दोन दिवसांत चर्चाही नाही
मुंबई : नव्या सरकारच्या शपथविधीचा मुहूर्त समिप येऊन ठेपला तरी शिवसेनेसोबतच्या चर्चेची कोंडी कायम ठेऊन भाजपाने दबावतंत्रचा अवलंब केला आहे. त्यामुळे गुरुवारी होणा:या शपथविधी समारंभात कदाचित भाजपाचेच मंत्री शपथ घेतील, अशी राजकीय अटकळ बांधली जात आहे. त्यामुळेच की काय, एका खासगी समारंभानिमित्त मुंबई भेटीवर आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट होऊ नये, म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्या समारंभाला जायचे टाळले.
नवा नेता निवडण्यास सोमवारी भाजपा विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली आहे. मात्र दिवाळीसाठी गावी गेलेले सर्व आमदार उपस्थित राहू शकतील की नाही, याबाबत साशंकता असल्याने ही बैठक कदाचित मंगळवारी होऊ शकेल. मंगळवारी नेता निवड झाल्यानंतर बुधवारी राज्यपालांना सरकार स्थापन करण्यासाठीचे पत्र दिले जाईल आणि गुरुवारी शपथविधी होईल, असे पक्षाच्या सूत्रंनी सांगितले.
केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग हे सोमवारीच मुंबईत दाखल होत आहे. निवडणुकीत भाजपा सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आल्यानंतर राजनाथसिंग यांची महाराष्ट्राचे निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. दरम्यान, राज्यात सरकार स्थापन करण्यावरून भाजपाची सेनेसोबत पडद्याआडून सुरू असलेली बोलणी थांबलेली आहेत. सेनेचे खा. अनिल देसाई आणि ज्येष्ठ नेते सुभाष देसाई हे दिल्लीहून परतल्यापासून दोन दिवसांत भाजपाकडून शिवसेनेशी कसलाही संपर्क साधण्यात आलेला नाही. त्यामुळे संभाव्य मंत्रिमंडळात सेनेच्या वाटय़ाला किती मंत्रिपदे येतील, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या सूचनेनुसार मंत्रिमंडळाचा आकार लहान ठेवण्यात येणार असल्यामुळे शिवसेनेला कमीत कमी मंत्रिपदे देण्यात येतील व त्यासाठीच भाजपा दबावतंत्रचा वापर करीत आहे. (विशेष प्रतिनिधी)
शपथविधी, मंत्रिमंडळ अथवा इतर कुठल्याही बाबींसाठी अद्याप आमच्याशी कोणीही संपर्क साधलेला नाही. कदाचित सोमवारपासून चर्चा होऊ शकेल.
-खा. संजय राऊत, शिवसेना नेते
वानखेडे स्टेडियमवर होणार सोहळा
मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील काही प्रमुख नेत्यांचा शपथविधी वानखेडे स्टेडियमवर होणार असून, त्यासाठी 28 आणि 29 तारखेचे बुकिंग भाजपाने केले आहे. सूत्रंनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारऐवजी मंगळवारी नेतानिवड झाली तर शपथविधी गुरुवारी, 3क् ऑक्टोबर रोजी होऊ शकतो. त्यामुळे एक दिवसाची मुदत वाढवून घेण्यात येणार आहे.
घटक पक्षांना न्याय द्या -शेट्टी : या निवडणुकीत घटक पक्षांमुळेच भाजपाला मोठे यश मिळाले असून, मंत्रिमंडळात या पक्षांना योग्य ते स्थान मिळावे, अशी अपेक्षा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केली. शिवसेनेवर आम्ही टीका केली नाही त्याचाच फटका आम्हाला बसला, असेही ते म्हणाले.
निमंत्रण नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीएच्या खासदारांसाठी दिल्लीत 26 रोजी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाचे निमंत्रण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मिळाले नसल्यामुळे ते दिल्लीला जाणार नाही, असे शिवसेनेतील सूत्रंनी सांगितले.
टाळली मोदींची भेट !
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या एच. एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलच्या समारंभाचे निमंत्रण मिळून देखील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या समारंभाला जायचे टाळले. राज्यातील राजकीय घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर ही घटना घडल्याने अनेक तर्क-वितर्क लढविले जात आहेत.