शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाचा प्लॅन; महाराष्ट्रातील नेत्यांची दिल्लीत खलबतं

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2022 14:52 IST

केंद्रीय मंत्र्यांना लोकसभा मतदारसंघनिहाय प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

नवी दिल्ली - आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपानं तयारी सुरु केली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज दिल्लीत होते. त्यावेळी भाजपाचे केंद्रीय मंत्र्यांसोबत त्यांनी बैठक घेत संघटनात्मक कामाचा आढावा घेतला. लोकसभा प्रवास योजना या मोहिमेवर बैठकीत चर्चा करण्यात आली. या बैठकीला मंत्री रावसाहेब दानवे, कपिल पाटील, नारायण राणे, भारती पवार यांच्यासह इतर नेते उपस्थित होते. 

या बैठकीत केंद्रीय मंत्र्यांना लोकसभा मतदारसंघनिहाय प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. या मंत्र्यांनी महिन्यातून १-२ दिवस त्या मतदारसंघासाठी द्यावा असं बैठकीत ठरलं आहे. राज्यातील विकास कामांसाठी राज्य सरकार काम करतेय. संघटना म्हणून मी माझी जबाबदारी पार पाडतोय. मुंबईतही आज रात्री राज्याचे सहसंघटन मंत्री, राष्ट्रीय प्रभारी यांच्या उपस्थितीत राज्यातील मंत्री, संघटनांचे पदाधिकारी यांच्यात समन्वय बैठक आयोजित करण्यात आली आहे. यात संघटना आणि सरकार यातून विकासाचं पाऊल पुढे टाकायचं आहे असं प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. 

त्याचसोबत महाराष्ट्रात २०२४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, जे पी नड्डा यांच्या नेतृत्वात आम्ही राज्यात ४५ लोकसभा मतदारसंघात भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना एकत्रित निवडणुका लढू आणि जिंकू असं निश्चित केले आहे. राज्यातील जनता महाविकास आघाडीला वैतागली आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस एकत्रित राज्याचा कारभार विकासाच्या दृष्टीने पुढे घेऊन जात आहे असं बावनकुळेंनी म्हटलं. 

विरोधकांचा डाव हाणून पाडूजे प्रकल्प राज्याबाहेर गेले. त्याबद्दल माहिती अधिकारात माहिती मागवली तर ते सर्व प्रकल्प मविआ सरकारच्या नाकर्तेपणामुळे आणि मुख्यमंत्री मंत्रालयात नसल्याने, राज्यात पोषक वातावरण निर्माण न झाल्याने हे प्रकल्प राज्याबाहेर गेले. खोटं बोला पण रेटून बोला, सरकार गेल्यामुळे अस्वस्थ आहेत. शेवटची घरघर राहिले ते थांबवण्यासाठी हा केविळवाणा प्रयत्न आहे. खोटं नरेटिव्ह सेट करून तिन्ही पक्ष वेगवेगळ्या तोंडाने बोलतात. सरकार काम करतेय त्याला अडथळा आणण्याचा प्रयत्न करतायेत. आम्ही भाजपा जिल्हाजिल्ह्यात महाविकास आघाडीचा खोटा अजेंडा हाणून पाडू असा इशारा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. 

मविआला उमेदवारही मिळणार नाहीत महाविकास आघाडीच्या नेत्यांना पुढच्या काळात अनेक प्रवेशाचे बॉम्बस्फोट होणार, तिन्ही पक्षातील नेते भाजपात येतील. विरोधकांना उमेदवार मिळणार नाही अशी परिस्थिती निर्माण होईल. मविआ कार्यकर्ते थांबवण्यासाठी हे सगळे एकत्रित नरेटिव्ह सेट करून ठेवतायेत. अडीच वर्ष जे पाप, बेईमानी केली त्यावरून जनता महाविकास आघाडीला रस्त्यावर आणण्याचं काम करणार आहे असा टोला भाजपानं लगावला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :BJPभाजपाMahavikas Aghadiमहाविकास आघाडी