शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाची मनसेला ऑफर, राज ठाकरेंचं सूचक विधान; पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2023 15:30 IST

राज्यात राजकीय घोळ झालाय त्यामुळे महापालिका निवडणुका लावतील आणि धोंडा पाडून घेतील असं वाटत नाही असंही राज यांनी सांगितले.

मुंबई – येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक मुंबईत घेतली. या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागा असा आदेश राज यांनी पदाधिकाऱ्यांना दिला. याच बैठकीत राज ठाकरे यांनी युतीवर भाष्य केले. भाजपाकडून युतीची ऑफर मिळाली आहे पण अद्याप आपण कुठलाही निर्णय घेतला नाही असं राज यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितल्याची माहिती आहे.

मनसेच्या बैठकीत लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने चर्चा करण्यात आली. त्यात लोकसभा निहाय मतदारसंघात मनसेची टीम जाणार, तिथल्या परिस्थितीचा आढावा घेणार त्यानंतर पुढील कार्यक्रम हाती घेणार असल्याचे बैठकीत ठरले. मनसे-भाजपा-शिंदे गटासोबत युतीत जाणार अशी चर्चा मागील वर्षभरापासून सुरू आहे. त्यावरही राज ठाकरेंनी यांनी पदाधिकाऱ्यांना थेट सांगितले. भाजपाकडून आपल्याला ऑफर आहे परंतु मी त्यावर अजून निर्णय घेतला नाही. एकनाथ शिंदे आणि नुकतेच युतीत सामील झालेले अजित पवार यांचे भाजपा काय करणार, पुढचे गणित कसे जुळवणार याची स्पष्टता नाही. त्यामुळे मी अजून निर्णय घेतला नाही. युतीबाबत तुम्ही चर्चा करू नका. सध्या पक्ष वाढवणे हे महत्त्वाचे आहे असं राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना सांगितले.

राज ठाकरेंचं सूचक विधान

मध्यंतरी मनसेच्या युतीबाबत चर्चा सुरू होत्या, मनसेची एकला चलो रे ची भूमिका आहे का असा प्रश्न पत्रकारांनी बैठकीनंतर राज ठाकरेंना विचारला होता. तेव्हा राज ठाकरे म्हणाले की, काय वदवून घ्यायचंय? परिस्थितीनुसार गोष्टी घडतात. आता तुम्हाला सवयही झालीय. दोन दिवसांपूर्वी काय बोलले जाते आणि दोन दिवसानंतर काय घडते आता हे पत्रकारांना नवीन नाही. परंतु महाराष्ट्राची प्रताडणा जास्तीत जास्त होणार नाही याची काळजी आमच्याकडून घेतली जाईल. जी घेत होतो ती यापुढेही घेतली जाईल असं सूचक विधान त्यांनी केले.

महापालिका निवडणुका लागतील वाटत नाही

यावर्षी महापालिका लागतील असं वातावरण दिसत नाही. राज्यात राजकीय घोळ झालाय त्यामुळे महापालिका निवडणुका लावतील आणि धोंडा पाडून घेतील असं वाटत नाही. आता लोकसभेच्या निवडणुका लागतील. आम्ही प्रत्येक मतदारसंघनिहाय टीम पाठवू आणि आढावा घेतला जाईल. आता लोकसभेच्या निवडणुका लागतील त्यादृष्टीने आजची बैठक होती. पनवेलला माझा मेळावा आहे. मुंबई-गोवा महामार्गावर जे खड्डे पडलेत त्यावर मी बोलणार आहे असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेBJPभाजपा