शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

भाजपचे पुढचे टार्गेट मुंबई, कोकण अन् शिवसेना! राणे, पाटील यांच्या समावेशाने शिवसेनेला शह

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2021 08:36 IST

राणे यांची राजकीय कारकीर्द मुंबईत सुरू झाली आणि कोकणातील राजकारणावरही त्यांचा प्रभाव आहे. शिवसेनेचे कट्टर विरोधक अशी त्यांची प्रतिमा आहे. ठाकरे परिवार आणि शिवसेनेवर थेट हल्लाबोल करणारे नेते म्हणून ते ओळखले जातात.

यदू जोशी -मुंबई: नारायण राणे आणि कपिल पाटील यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देऊन मुंबईकोकणावर भाजपने विशेष लक्ष केंद्रित करण्याचे ठरविले असून, या ठिकाणी असलेल्या शिवसेनेच्या वर्चस्वाला शह देण्याची पुढील काळात रणनीती दिसते.

राणे यांची राजकीय कारकीर्द मुंबईत सुरू झाली आणि कोकणातील राजकारणावरही त्यांचा प्रभाव आहे. शिवसेनेचे कट्टर विरोधक अशी त्यांची प्रतिमा आहे. ठाकरे परिवार आणि शिवसेनेवर थेट हल्लाबोल करणारे नेते म्हणून ते ओळखले जातात. शिवसेनेचा विरोध असल्याने त्यांच्या भाजप प्रवेशात आणि नंतर त्यांना राज्यसभेची खासदारकी मिळण्यात विलंब झाला, असे म्हटले गेले होते. राणे यांच्या रूपाने प्रखर शिवसेना विरोधकास संधी दिल्याने यापुढील काळात दोन पक्षांमधील संबंध अधिक ताणले जातील, असे दिसते. हे दोन पक्ष पुन्हा एकदा जवळ येणार असल्याचे म्हटले जात होते; पण मंगळवारी संपलेले विधिमंडळ अधिवेशन आणि बुधवारी राणेंचा मंत्रिमंडळात झालेला समावेश पाहता दोन्ही पक्षांमधील कटुता वाढण्याची शक्यता आहे.

मुंबई, ठाणे आणि परिसरातील महापालिकांच्या निवडणुका यावर्षी आणि पुढील वर्षीच्या सुरुवातीला होत आहेत. मुंबई, कोकणात राणे तर ठाणे, भिवंडी, पालघरच्या पट्ट्यात कपिल पाटील यांच्या प्रभावाचा वापर शिवसेनेचा वारू रोखण्यासाठी करवून घेण्याची भाजपची रणनीती दिसते. मुंबई व परिसरात मोठी संख्या असलेल्या आगरी समाजाच्या व्होटबँकेवर भाजपने लक्ष केंद्रित केलेले दिसते. प्रीतम मुंडे यांना मंत्री न करता डॉ. भागवत कराड यांच्या रूपाने वंजारी चेहरा दिला गेला; हा मुंडे परिवारासाठी धक्का मानला जातो.

प्रकाश जावडेकर आणि संजय धोत्रे यांना वगळले. हे दोघेही मूळ भाजपजन आहेत. धोत्रे हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी समर्थक मानले जातात. नारायण राणे, कपिल पाटील व भारती पवार हे मूळ भाजपजन नाहीत. राणे यांचा प्रवास शिवसेना-काँग्रेस-भाजप असा राहिला, तर पाटील व पवार पूर्वी राष्ट्रवादीत होते. बाहेरून आलेल्यांना पक्षात संधी आजवर दिली गेली नव्हती. आता तो दरवाजा उघडलेला दिसतो. जावडेकर यांना वगळणे सर्वांत धक्कादायक ठरले. रावसाहेब दानवे यांनी स्वत:चे स्थान टिकवले. धोत्रे यांना वगळल्याने विदर्भाचा टक्का कमी झाला; पण महाराष्ट्राचा वाढला आधी महाराष्ट्राचे तीन कॅबिनेट आणि तीन राज्यमंत्री होते. आता तीन कॅबिनेट आणि पाच राज्यमंत्री असतील.

मंत्रिमंडळात नव्याने समाविष्ट झालेले चारही चेहरे बघता विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भूमिका महत्त्वाची ठरली असे दिसते. स्वत: फडणवीस यांनी ते केंद्रात जाणार नाहीत, हे आधीच स्पष्ट केले होते. मंत्रिमंडळात महाराष्ट्राला प्रतिनिधित्व देण्यासंदर्भात ज्या निवडक नेत्यांशी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी चर्चा केली, त्यात फडणवीस प्रामुख्याने होते.

केंद्रीय मंत्री विभागनिहाय- पीयूष गोयल, नारायण राणे, रामदास आठवले,कपिल पाटील (मुंबई, कोकण) - ४- नितीन गडकरी (विदर्भ) - १- डॉ. भारती पवार (उत्तर महाराष्ट्र) - १- रावसाहेब दानवे, भागवत कराड (मराठवाडा) - २

- नारायण राणे (मराठा), कपिल पाटील (आगरी), डॉ. भारती पवार (आदिवासी) आणि डॉ. भागवत कराड (वंजारी) असे सामाजिक संतुलन साधण्यात आले.- प्रकाश जावडेकर यांना वगळल्याने पश्चिम महाराष्ट्राला मोदी मंत्रिमंडळात स्थान नाही. केंद्रीय मंत्रिमंडळात आधी महाराष्ट्राचे सहा मंत्री होते आता ही संख्या आठ झाली आहे.- डॉ. संजय धोत्रे यांना वगळल्याने विदर्भाचे प्रतिनिधित्व एकाने कमी झाले.- डॉ. भागवत कराड यांना संधी लाभल्याने आणि रावसाहेब दानवे आधीच राज्यमंत्री असल्याने  मराठवाड्याचे दोघे केंद्रात मंत्री असतील. 

टॅग्स :BJPभाजपाShiv SenaशिवसेनाNarayan Raneनारायण राणेMumbaiमुंबईkonkanकोकण