काँग्रेसच्या ३४ जागांवर भाजपाचा डल्ला
By Admin | Updated: October 21, 2014 05:05 IST2014-10-21T04:38:03+5:302014-10-21T05:05:36+5:30
निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रत्येक पक्ष विजयासाठी झटत असतो. स्वत:कडची जागा टिकवतानाच विरोधकांची जागा स्वत:कडे खेचण्याची रस्सीखेच सुरु असते

काँग्रेसच्या ३४ जागांवर भाजपाचा डल्ला
मुंबई : निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रत्येक पक्ष विजयासाठी झटत असतो. स्वत:कडची जागा टिकवतानाच विरोधकांची जागा स्वत:कडे खेचण्याची रस्सीखेच सुरु असते. यंदा या रस्सीखेचीत भाजपा सर्वाधिक यशस्वी ठरली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे आणि अपक्षांच्या जागा काबीज करत भाजपाने १२२ चा पल्ला गाठला.
गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला ४६ जागांवर यश मिळाले. त्यापैकी ३९ जागा राखण्यात पक्षाला यश मिळाले. तर ७ जागांवर पराभवाचा सामना करावा लागला. या ७ जागांपैकी ४ काँग्रेस, २ राष्ट्रवादी आणि १ जागेवर अपक्ष उमेदवाराने कब्जा केला आहे. यंदाच्या १२२ जागांमध्ये स्वत:कडे असणा-या ३९ जागांव्यतिरिक्त काँग्रेसकडे असणा-या ३४ जागा खेचण्यात भाजपाला यश
मिळाले. तर, राष्ट्रवादीच्या ताब्यातील १७, शिवसेनेच्या १३, मनसेच्या ०६ आणि अन्य उमेदवारांच्या ताब्यातील १३ जागा भाजपाने स्वत:कडे खेचण्यात यश मिळविले आहे. (प्रतिनिधी)