भाजपाचे ‘मिशन मुंबई’
By Admin | Updated: January 31, 2015 05:34 IST2015-01-31T05:34:27+5:302015-01-31T05:34:27+5:30
आगामी महापालिका निवडणूक समोर ठेवून भारतीय जनता पार्टीने आता मुंबईवर लक्ष केंद्रित केले असून, ‘ग्लोबल मुंबई’साठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भाजपाचे ‘मिशन मुंबई’
मुंबई : आगामी महापालिका निवडणूक समोर ठेवून भारतीय जनता पार्टीने आता मुंबईवर लक्ष केंद्रित केले असून, ‘ग्लोबल मुंबई’साठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वित्त, सेवा आणि मनोरंजन या तीन क्षेत्रांवर फोकस करण्याचे निश्चित केले आहे.
मुंबईच्या विकासासंदर्भात मुख्यमंत्री कार्यालयात आधीच सेल स्थापन करण्यात आला आहे. आता राज्य शासन आणि ‘मुंबई फर्स्ट’ संस्थेच्या वतीने ६ फेब्रुवारीला मुंबईत परिषद होणार आहे. टाटा समूहाचे अध्यक्ष सायरस मिस्री, प्रख्यात उद्योगपती मुकेश अंबानी, स्टेट बँकेच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अरुंधती भट्टाचार्य, महानायक अमिताभ बच्चन, विविध देशांच्या दूतावासांचे अधिकारी यांच्यासह अनेक दिग्गज सहभागी होणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली.
विविध क्षेत्रातील मान्यवरांची मते जाणून घेणार असून, त्या आधारे एक व्यापक आराखडा तयार करण्यात येणार आहे. वित्तीय तसेच सेवा आणि मनोरंजन क्षेत्रातील अडचणी काय आहेत आणि त्या कशा दूर
करता येतील, यावर परिषदेत चर्चा होईल. (विशेष प्रतिनिधी)