भाजपाची जम्बो शहर कार्यकारिणी जाहीर

By Admin | Updated: June 30, 2016 01:30 IST2016-06-30T01:30:51+5:302016-06-30T01:30:51+5:30

महापालिकेच्या फेब्रुवारी २०१७ मध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर भाजपाने बुधवारी जम्बो कार्यकारिणी जाहीर केली आहे.

BJP's Jumbo city executive announces | भाजपाची जम्बो शहर कार्यकारिणी जाहीर

भाजपाची जम्बो शहर कार्यकारिणी जाहीर


पुणे : महापालिकेच्या फेब्रुवारी २०१७ मध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर भाजपाने बुधवारी जम्बो कार्यकारिणी जाहीर केली आहे. शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांची नावे जाहीर केली.
भाजपा शहराध्यक्षपदाचा कायर्भार स्वीकारल्यानंतर योगेश गोगावले यांनी सर्वांना सामावून घेणारी कार्यकारिणी जाहीर केली आहे. यामध्ये सर्व गटातटाच्या कार्यकर्त्यांना सामावून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. भाजपा युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी दीपक पोटे व महिला मोर्चा अध्यक्षपदी शशिकला मेंगडे यांची वर्णी लागली आहे. कायम निमंत्रित कायर्कारिणी सदस्यांमध्ये शहरातील भाजपाचे खासदार, सर्व आमदार, नगरसेवक, शिक्षण मंडळ सदस्य,
कॅन्टोन्मेंटचे सदस्य यांचा समावेश केला आहे.
युवा मोर्चा सरचिटणीस - सुशील मेंगडे, अमोल बालवडकर, सचिन मारणे अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष - डॉ. भरत वैरागे इतर मागासवर्गीय आघाडी अध्यक्ष -अशोक मुंडे, ओबीसी आघाडी - प्रताप चोरघे, कल्पना पुरंदरे, शिवाजी शेलके, अशोक शेलार, विशाल गांधिले, बिभीषण मुडे, भारत निजामपूरकर, नंदकुमार मंडोरा, दीपक नागपुरे, विकास लवटे-भटके, अशोक लाकडे, ज्ञानेश्वर शिंदे, किरण ओरसे, जीवन माने, दिलीप उंबरकर, सुरेश घाटे, राजाभाऊ जोरी, उमेश चौधरी. व्यापारी आघाडी - श्याम कलंत्री, भगिरथ भुतडा, किशोर सिंघवी, अनिल मेहता, नंदू शर्मा, संजय अगरवाल, ईश्वर कांकरिया, दत्तात्रय देशमुख आयटी सेल संयोजक - सचिन मांढरे, आनंद बहिरट.
सोशल मीडिया सेल संयोजक- प्रतीक धात्रक, अनघा परांजपे, गंधार भंडारी, शिव सिंग, अभिजित पांडे, रणजित राणे, विनीत वाजपेयी, अमेय पारटकर, तरुण मालवीय.
>शहर भाजपा कार्यकारिणी पुढीलप्रमाणे : उपाध्यक्ष - श्याम सातपुते, मुक्ता टिळक, सुनील कांबळे, संदीप खर्डेकर, प्रकाश मंत्री, आबा तुपे, दत्ता खाडे,
डॉ. संदीप बुटाला.
सरचिटणीस - मुरली मोहोळ दीपक मिसाळ, उज्ज्वल केसकर, गणेश घोष चिटणीस - मुकेश गवळी, विनोद वस्ते, प्रभावती मटाले, महेंद्र गलांडे, श्रीकांत नाझीरकर, राजू शेंडगे, विश्वास आहेर, गिरीश खत्री. कोषाध्यक्ष - विनायक आंबेकर, प्रचार व प्रसिद्धीप्रमुख - संजय मयेकर कार्यालयप्रमुख - उदय जोशी बूथरचना संयोजक - गोपाल चिंतल, सुहास कुलकर्णी.

Web Title: BJP's Jumbo city executive announces