मुंबईवगळता नऊ पालिकांत भाजपाला सर्वाधिक मतदान
By Admin | Updated: February 28, 2017 05:06 IST2017-02-28T05:06:31+5:302017-02-28T05:06:31+5:30
मुंबईवगळता अन्य नऊ महापालिका निवडणुकीत भाजपाला सर्वाधिक म्हणजे एकूण वैध मतांच्या ३५.३६ (८१,१७,२८९) टक्के मते मिळाली.

मुंबईवगळता नऊ पालिकांत भाजपाला सर्वाधिक मतदान
मुंबई : मुंबईवगळता अन्य नऊ महापालिका निवडणुकीत भाजपाला सर्वाधिक म्हणजे एकूण वैध मतांच्या ३५.३६ (८१,१७,२८९) टक्के मते मिळाली. शिवसेनेचा दुसरा क्रमांक असला तरी या पक्षाला भाजपाच्या जवळपास निम्मी म्हणजे १८.१३ (४१,६१,०५२) टक्के मते मिळाली.
मुंबईमध्ये शिवसेनेने २२७ जागा लढविल्या आणि ८४ जिंकल्या. या पक्षाच्या सर्व उमेदवारांना एकत्रित २८.८३ टक्के (१४,४६,४२८) मते मिळाली. त्याखालोखाल भाजपाला २७.९२ टक्के (१४,००,५००) इतकी मते मिळाली. मुंबईत तिसऱ्या क्रमांकाची म्हणजे १६.५४ टक्के (८,२९,८९४) मते काँग्रेसने मिळवली.
जिल्हा भाजपाला सर्वाधिक तर दुसऱ्या क्रमांकाची मते राष्ट्रवादीला मिळाली. काँग्रेस तिसऱ्या तर शिवसेना चवथ्या क्रमांकावर आहे. शिवसेनेने संपूर्ण लक्ष मुंबई पालिकेवर केंद्रित केले होते. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जिपच्या प्रचारासाठी एकही सभा घेतली नाही. तर पक्षाचे अन्य मोठे नेतेदेखील या निवडणुकीकडे फारसे फिरकले नाहीत. त्याचा फटका सेनेला ग्रामीण भागात बसला. महापालिकांबरोबर जिल्हा परिषदांमध्येही भाजपाने पहिल्यांदाच क्रमांक १ची मते मिळविली. मुख्यमंत्र्यासह संपूर्ण पक्षाने महापालिकांबरोबरच जिल्हा परिषद निवडणुकीवरही तेवढेच लक्ष केंद्रित केले होते. (विशेष प्रतिनिधी)
>227 प्रभागांच्या मुंबई महापालिकेत सर्वाधिक २८.८३ टक्के मते शिवसेनेला पडली असली तरी त्यापेक्षा एक टक्क्यांपेक्षा कमी म्हणजे ०.९१ टक्के कमी मते भाजपाला पडली आहेत.
>मुंबईत असे झाले मतदान
राजकीय पक्षमिळालेली मतेमतांची
टक्केवारी
शिवसेना१४४६४२८२८.८३
भाजपा१४००५००२७,९२
काँग्रेस८२९८९४१६.५४
मनसे३९५०४७७.८८
अपक्ष२८३२९३५.६५
राष्ट्रवादी२४८५६६४.९६
अन्य१२७८२८२.५५
एमआयएम१२७७४०२.५५
समाजवादी पार्टी१११२९१२.२२
बसपा४५७९६०.९१
>नऊ महापालिका
(नागपूर, अकोला, अमरावती,
पुणे, नाशिक, ठाणे, पिंपरी-चिंचवड, उल्हासनगर, सोलापूर)
राजकीय पक्षमिळालेली मतेटक्केवारी
भाजपा८११७२८९३५.३६
शिवसेना४१६१०५२१८.१३
राष्ट्रवादी३४१७०७२१४.८८
काँग्रेस३०१६८३२१३.१४
अपक्ष१२१५७२०५.३०
मनसे९०९६३२३.९६
बसपा७६७२७८३.३४
एमआयएम४४९३७३१.९६
अन्य९०२७८३३.९३
>जिल्हा परिषदांमधील प्रमुख पक्षांचे मतदान
राजकीय पक्षमिळालेली मतेमतांची टक्केवारी
भाजपा ६३७६०५४२४.९१
राष्ट्रवादी५६९३६९४२२.२५
काँग्रेस४९७२२७२१९.४३
शिवसेना४७३९९७६१८.५२
अपक्ष१३६०६६१५.३२