विधानसभेच्या अध्यक्षपदी भाजपाचे हरिभाऊ बागडे

By Admin | Updated: November 13, 2014 01:27 IST2014-11-13T01:27:00+5:302014-11-13T01:27:00+5:30

विधानसभेच्या अध्यक्षपदी भाजपाचे ज्येष्ठ नेते हरीभाऊ बागडे यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली.

BJP's Haribhau Bagade has been elected as the President of the Legislative Assembly | विधानसभेच्या अध्यक्षपदी भाजपाचे हरिभाऊ बागडे

विधानसभेच्या अध्यक्षपदी भाजपाचे हरिभाऊ बागडे

मुंबई : विधानसभेच्या अध्यक्षपदी भाजपाचे ज्येष्ठ नेते हरीभाऊ बागडे यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली. शिवसेनेचे विजय औटी आणि काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी उमेदवारी मागे घेतल्यानंतर बागडे यांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला. 
सभागृहाची आजवरची उच्च परंपरा कायम राखत अध्यक्षांची निवड बिनविरोध व्हावी यासाठी माघार घेतल्याचे औटी आणि गायकवाड यांनी सभागृहात सांगितले. अध्यक्षांची बिनविरोध निवड झाल्यानंतर राष्ट्रवादीचे आर.आर.पाटील आणि छगन भुजबळ यांच्या टोलेबाजीने राजकीय तणावाच्या स्थितीची जागा हास्यविनोदाने घेतली. 
69 वर्षीय बागडे हे पाचव्यांदा विधानसभेवर निवडून आले असून युती शासनाच्या काळात कॅबिनेट मंत्री होते. त्यांच्या निवडीने एक हाडाचा शेतकरी, तळमळीचा कार्यकर्ता आणि अजातशत्रू नेता अध्यक्षपदी विराजमान झाला आहे. 
बागडे हे समाजकारण,राजकारणातील सुसंस्कृत व्यक्तिमत्व  असल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संपूर्ण सभागृहाने व्यक्त केली.  राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनसंघ आणि भाजपाच्या माध्यमातून वाटचाल केलेले बागडे यांची कारकीर्द सभागृहाचा सन्मान वाढविणारा असेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. 
मुख्यमंत्र्यांनी बागडे यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे, काँग्रेसचे गटनेते राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादीचे गटनेते आर.आर.पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, शेकापचे गणपतराव देशमुख, शिवसेनेचे अजरून खोतकर, बविआचे हितेंद्र ठाकूर, कम्युनिस्ट पक्षाचे जिवा पांडू गावित,एमआयएमचे इम्तियाज जलिल यांनी बागडे यांचे अभिनंदन केले. (विशेष प्रतिनिधी) 
 
सभागृहाचा वेळ हा गोंधळ वा इतर विषयांवर खर्ची घालण्याऐवजी नवीन कायदे बनविणो, जुने दुरुस्त करणो आणि कालबा कायदे रद्द करण्यावर भर दिला पाहिजे, अशी भावना दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केली.
 
बागडे अध्यक्ष झाल्याने ज्येष्ठ सदस्य गिरीश बापट यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असेल कारण आता त्यांचा मंत्रिपदाचा मार्ग मोकळा झाला,असा चिमटा राधाकृष्ण विखे पाटील यांनी काढला. 
 
हरिभाऊ बागडे विधानसभेचे 15वे अध्यक्ष
विधानसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष हरिभाऊ बागडे हे 196क्मध्ये द्विभाषिक महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यापासूनचे 15वे विधानसभा अध्यक्ष आहेत. व्यक्ती म्हणून विचार केला तर बागडे हे त्या पदाच्या खुर्चीवर बसणारे 14वे अध्यक्ष आहेत. त्याआधी मुंबई इलाख्याच्या विधानसभेच्या कालावधीत (1937 ते 196क्) चार अध्यक्ष झाले होते. 
 
196क्पासून महाराष्ट्र विधानसभा
सयाजी लक्ष्मण सिलम : 1/5/196क् ते 12/3/1962
त्र्यंबक शिवराम भारदे : 17/3/1962 ते 13/3/1967
15/3/1967 ते 15/3/1972
शेषराव कृष्णराव वानखेडे : 22/3/1972 ते 2क्/4/1977
दौ. श्री. ऊर्फ बाळासाहेब देसाई : 4/7/1977 ते 13/3/1978
शिवराज विश्वनाथ पाटील : 17/3/1978 ते 6/12/1979
प्राणलाल हरकिशनदास व्होरा : 1/2/198क् ते 29/6/198क्
शरद शंकर दिघे : 2/7/198क् ते 11/1/1985
शंकरराव चिमाजी जगताप : 2क्/3/1985 ते 19/3/199क्
मधुकरराव धनाजी चौधरी : 21/3/199क् ते 22/3/1995
दत्ताजी शंकर नलावडे : 24/3/1995 ते 19/1क्/1999
अरुणलाल गोवर्धनदास गुजराती : 22/1क्/1999 ते 17/1क्/2क्क्4
बाबासाहेब कुपेकर : 6/11/2क्क्4 ते 3/11/2क्क्9
दिलीप दत्तात्रय वळसे पाटील : 11/11/2क्क्9 ते
 
196क्पासून महाराष्ट्र विधान परिषद 
भानुशंकर याज्ञिक : 15/3/1962 ते 17/3/1962
वसंत नारायण नाईक : 13/3/1967 ते 15/3/1967
रत्नाप्पा भरमाप्पा कुंभार : 2क्/3/1972 ते 22/3/1972
                                 :22/3/1995 ते 24/3/1995
डी़एस़ ऊर्फ बाळासाहेब देसाई : 25/4/1977 ते 1/7/1977
                                            :14/3/1978 ते 17/3/1978
                                            : 3क्/6/198क् ते 2/7/198क्
पी़क़े देशमुख  : 1/7/1977 ते 4/7/1977
केशवराव शंकरराव धोंडगे : 16/3/1985 ते 2क्/3/1985
गणपतराव अण्णासाहेब देशमुख : 18/3/199क् ते 21/3/199क्
                                          : 4/11/2क्क्4  ते 6/11/2क्क्4
                                          : 9/11/2क्क्9  ते 11/11/2क्क्9
शंकरराव गेणुजी कोल्हे : 2क्/1क्/1999 ते 22/1क्/1999 
 

 

Web Title: BJP's Haribhau Bagade has been elected as the President of the Legislative Assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.