भाजपाच्या गडात सेनेची पक्षबांधणी!
By Admin | Updated: January 30, 2015 04:09 IST2015-01-30T04:09:37+5:302015-01-30T04:09:37+5:30
भाजपाचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या विदर्भात शिवसेनेने पक्षबांधणीसाठी लक्ष केंद्रित केले आहे. शिवसंपर्क अभियानाद्वारे सुरूकेलेल्या

भाजपाच्या गडात सेनेची पक्षबांधणी!
नागपूर : भाजपाचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या विदर्भात शिवसेनेने पक्षबांधणीसाठी लक्ष केंद्रित केले आहे. शिवसंपर्क अभियानाद्वारे सुरूकेलेल्या ‘मिशन विदर्भ’च्या माध्यमातून बालेकिल्ल्यात भाजपाला शह देण्याचे सेनेचे प्रयत्न आहेत. यासाठी पक्षाचे सर्व प्रमुख नेते प्रत्येक जिल्ह्यात कार्यकर्त्यांच्या बैठका घेत आहेत.
सेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी दोन दिवस नागपूरमध्ये पक्षाच्या प्रमुख नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. २०१४मध्ये झालेल्या लोकसभा आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत विदर्भात भाजपाला घवघवीत यश मिळाले. यामुळे विदर्भ हा भाजपाचा बालेकिल्ला ठरला आहे. त्यापूर्वीच्या काळात या भागात भाजपाप्रमाणेच शिवसेनेचीही ताकद होती. विशेषत: विदर्भात पश्चिम विदर्भ हा सेनेचा बालेकिल्ला मानला जात होता, तर पूर्व विदर्भातील वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया जिल्ह्यातही सेनेचे आमदार निवडून येत होते. विधानसभा निवडणुकीत ऐन वेळी युती तुटल्याने सेनेची पीछेहाट झाली. आता शिवसेनेने ‘शिवसंपर्क’ अभियानाच्या निमित्ताने ‘मिशन विदर्भ’ सुरू केले आहे. शिवसेनेच्या नेत्यांचे विदर्भात दौरे सुरूआहेत़ (प्रतिनिधी)