भाजपचा जल्लोष

By Admin | Updated: November 13, 2014 00:59 IST2014-11-13T00:59:06+5:302014-11-13T00:59:06+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील भाजप सरकारने विधानसभेत विश्वासदर्शक ठराव पारित करण्यात यश मिळविल्याच्या आनंदात भाजप कार्यकर्त्यांनी बुधवारी महाल येथील टिळक

BJP's dazzling | भाजपचा जल्लोष

भाजपचा जल्लोष

विश्वासदर्शक ठराव पारित : फटाक्यांची आतषबाजी
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील भाजप सरकारने विधानसभेत विश्वासदर्शक ठराव पारित करण्यात यश मिळविल्याच्या आनंदात भाजप कार्यकर्त्यांनी बुधवारी महाल येथील टिळक पुतळ्याजवळील पक्षाच्या शहर व जिल्हा मुख्यालयापुढे ढोलताशांच्या गजरात, फटाक्यांची आतषबाजी करीत एकच जल्लोष केला. एकमेकांना पेढे वाटून आनंद व्यक्त केला.
शिवसेनेने विधानसभेत विरोधात बसण्याची भूमिका घेतल्याने भाजप सरकारचा विश्वासदर्शक ठराव पारित होतो की नाही, याची उत्सुकता होती. ठराव पारित झाल्याचे वृत्त येताच भाजप कार्यक र्त्यांनी जल्लोष केला.
यावेळी संजय भेंडे, प्रमोद पेंडके, माजी महापौर कल्पना पांडे, अर्चना डेहनकर, माजी उपमहापौर जैतुनबी अशफाक अन्सारी, डॉ. कीर्तिदा अजमेरा, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष दयाशंकर तिवारी, मनपाच्या शिक्षण समितीच्या सभापती चेतना टांक, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निशा सावरकर, श्रीकांत देशपांडे, पं.स.चे माजी सभापती अजय बोढारे, टेकचंद सावरकर, जयप्रकाश गुप्ता, बळवंत जिचकार, सुमित्रा लुले, अरविंद गजभिये, दिलीप ठाकरे, बंटी कुकडे, चंदन गोस्वामी, गोपाल बोहरे, अशफाक पटेल, गजानन पांडे, रमेश वानखेडे, हाजी अब्दुल कादीर यांच्यासह उपराजधानीतील शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)

Web Title: BJP's dazzling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.