शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

'बविआ'समोर भाजपचे आव्हान! जागा शिंदेंच्या पण उमेदवार भाजपचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 16:55 IST

२०१९ मध्ये बविआने बोईसर, नालासोपारा आणि वसई या तीन मतदारसंघांवर वर्चस्व मिळविले होते.

हितेन नाईक, पालघरपालघर जिल्ह्यात सद्यःस्थितीत बहुजन विकास आघाडी हा सर्वात मोठा पक्ष असून, त्यांचे तीन आमदार आहेत. दुसरीकडे शरद पवार गट, माकप आणि शिंदेंची शिवसेना, असे अन्य तीन आमदार आहेत. पालघर लोकसभा भाजपने जिंकल्यानंतर त्यांनी आपले उमेदवार शिंदेंच्या शिवसेनेच्या तिकिटावर उभे केले आहेत. यंदा जिल्ह्यात महायुती, महाआघाडी आणि बविआ, अशी तिरंगी लढती रंगणार आहे.

२०१९ मध्ये बविआने बोईसर, नालासोपारा आणि वसई या तीन मतदारसंघांवर वर्चस्व मिळविले होते. बविआने बोईसर येथे छुप्या पद्धतीने एका अपक्षाला रसद पुरवून शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार विलास तरे यांचा पराभव करण्याची रणनीती यशस्वी केली होती.

त्यातच बविआचे चिन्हही गेल्याने हा स्थानिक पक्ष दुहेरी कात्रीत सापडला असून, बविआला जिंकण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.

पालघर जिल्ह्यात निवडणुकीतील कळीचे मुद्दे 

पालघर हा शिवसेनेचा बालेकिल्ला सेनेच्या दोन गटांत विभागला गेल्याने आव्हानात्मक ठरला असून, शिंदेसेना- उद्धवसेना वर्चस्वासाठी होणारी लढत रंगतदार ठरणार आहे. 

शिंदेसेनेला आपला उमेदवार जिंकण्याची गॅरंटी नसल्याने त्यांना भाजपमधून माजी खासदार राजेंद्र गावित यांना आयात करावे लागले आहे. त्यामुळे याच मतदारसंघातून निवडून आलेले, पण भाजपमध्ये गेलेल्या माजी आमदार अमित घोडा यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज सादर केला आहे.

निकोले यांच्याविरोधात आपल्याच पक्षातील काही पदाधिकाऱ्यांची नाराजी असल्याची चर्चा आहे. तिथे विनोद मेढा यांना भाजपने त्यांच्याविरोधात उतरविले आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४palgharपालघरBJPभाजपाHitendra Thakurहितेंद्र ठाकूरEknath Shindeएकनाथ शिंदे