शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 12:23 IST

Maharashtra Nagaradhyaksha Winners 2025: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या २८८ नगराध्यक्ष पदांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. भाजपने नगराध्यक्ष पदांचे शतक पूर्ण केले असून इतर पक्ष पिछाडीवर आहेत. 

Maharashtra Local Body Election Results 2025: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने पुन्हा एकदा जोरदार कामगिरी केली आहे. राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकांमध्ये शंभराहून अधिक ठिकाणी भाजपचे कमळ फुले आहे. ठाकरेंच्या शिवसेनेला मात्र चांगली प्रदर्शन करण्यात अपयश आले आहे. महाविकास आघाडीतील तीन प्रमुख पक्षापैकी काँग्रेसलाच चांगले प्रदर्शन करता आले आहे.

राज्यातील २८८ नगराध्यक्षपदाच्या सर्वच जागांचे निकाल जाहीर झाले आहेत. यात तीन ठिकाणी बिनविरोध निवडणुका झाल्या होत्या. तिथे भाजपने आधीच गुलाल उधळलेला आहे. 

Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी

शिंदे-अजित पवारांच्या राष्ट्रवादीला किती?

नगराध्यक्षपदाच्या २८८ पैकी १२२ जागांवर भाजपने विजय मिळवत मुसंडी मारली आहे. भाजपनंतर शिंदेंच्या शिवसेनेला चांगली कामगिरी करता आली आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे ५३ ठिकाणी नगराध्यक्ष निवडून आले आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसलाही ३९ ठिकाणी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत यश मिळाले आहे.

महाविकास आघाडीत कोणाचे किती नगराध्यक्ष?

विधानसभेप्रमाणेच स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी चांगले प्रदर्शन करण्यात अपयशी ठरली आहे. 

महाविकास आघाडीत सर्वाधिक नगराध्यक्ष काँग्रेसचे निवडून आले आहेत. काँग्रेसने नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत ३४ ठिकाणी विजय मिळवला आहे. त्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ०७ नगराध्यक्षपदाचे उमेदवार विजयी झाले आहेत. ठाकरेंची शिवसेना तळाला राहिली असून, ०८ नगराध्यक्षच विजयी झाले आहेत.

अपक्षांची कामगिरी चांगली

महाविकास आघाडीत सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या काँग्रेसपेक्षाही जास्त ठिकाणी अपक्ष नगराध्यक्ष निवडून आले आहेत. २५ नगराध्यक्ष अपक्ष म्हणून निवडून आले आहेत. 

तीन नगरपरिषदांमध्ये भाजप बिनविरोध

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपने जळगावमधील जामनेर, सोलापूरमधील अनगर आणि धुळ्यातील दोंडाई या तीन नगर परिषदांमध्ये विजयाचा गुलाल आधीच उधळला. या नगर परिषदांच्या नगरसेवक पदाच्या आणि नगराध्यक्षपदाच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. 

धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा नगराध्यक्षपदी मंत्री जयकुमार रावल यांच्या आई नयनकुंवर रावल आणि सर्व नगरसेवक बिनविरोध निवडून गेले आहेत. जळगाव जिल्ह्यातील जामनेरच्या 3 नगराध्यक्षपदी मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन या आधीच बिनविरोध निवडून गेल्या आहेत. अनगरमध्ये माजी आमदार राजन पाटील यांच्या सुनबाई प्राजक्ता पाटील या बिनविरोध जिंकल्या आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : BJP Leads in Maharashtra Local Elections; Thackeray Sena Lags Behind

Web Summary : BJP dominates Maharashtra's local body polls, securing over 100 Nagaradhyaksha posts. Shinde's Sena and NCP follow. Congress outperformed Thackeray's Shiv Sena. Independents also secured a significant number of posts.
टॅग्स :Local Body Electionमहाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल २०२५Maharashtra Election Resultsमहाराष्ट्र निवडणूक निकाल २०२५MahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडीBJPभाजपाShiv Senaशिवसेना