शहरं
Join us  
Trending Stories
1
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
2
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
3
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
4
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
5
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
6
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
7
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
8
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
9
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
10
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
11
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
12
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
13
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
14
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
15
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
16
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
17
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
18
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
19
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
20
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष

मागासवर्गाच्या मतांसाठी भाजपाचा ‘भीमसंकल्प’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2019 06:43 IST

येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांसाठी अनुसूचित जाती-जमाती, तसेच मागासवर्गीय समाजाची ‘व्होटबँक’ डोळ्यासमोर ठेवून भाजपाने ‘भीमसंकल्प’ तयार केला आहे.

- योगेश पांडे नागपूर : येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांसाठी अनुसूचित जाती-जमाती, तसेच मागासवर्गीय समाजाची ‘व्होटबँक’ डोळ्यासमोर ठेवून भाजपाने ‘भीमसंकल्प’ तयार केला आहे. फेब्रुवारी महिन्यापासून वस्त्या-वस्त्यांवर सामूहिक भोजनाच्या माध्यमातून व्यापक जनसंपर्क मोहीम हाती घेण्यात घेणार आहे, तसेच न्यायपालिकेत आरक्षण लागू करावे, असा प्रस्तावही अनुसूचित जाती मोर्चाच्या राष्ट्रीय अधिवेशनात पारित करण्यात आला.मागील साडेचार वर्षांत रोहित वेमुलाचे प्रकरण, उत्तर प्रदेशसह विविध राज्यात अनुसूचित जाती-जमातीच्या नागरिकांवर झालेले हल्ले, तसेच आरक्षणाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आलेल्या अनुचित वक्तव्यांमुळे वाद निर्माण झाले.केंद्रातील मोदी सरकार दलितविरोधी असल्याची टीका झाली. याचा फटका भाजपाला राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यातील निवडणुकीत बसला. म्हणूनच भाजपाशासित प्रदेशात अनुसूचित जातींच्या लोकांवर होत असलेल्या अत्याचारावर नियंत्रण आणण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे.एकीकडे आर्थिक निकषांवर १० टक्के आरक्षण देत सवर्णांना खूश केल्यानंतर आता अनुसूचित जाती-जमातींच्या ‘व्होटबँक’वर भाजपाने लक्ष केंद्रित केले आहे. यासाठीच नागपुरात अनुसूचित जाती मोर्चाच्या राष्ट्रीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री विजय सांपला, कृषी राज्यमंत्री कृष्णा राज, राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष विनोद सोनकर, दुष्यंत गौतम, नारायण केसरी आदी उपस्थित होते.२० ते ३० जानेवारी या कालावधीत देशभरात भाजपाच्या अनुसूचित जातीच्या राज्य व जिल्हा कार्यकारिणींच्या बैठका घेण्यात येणार आहेत. यात पुढील कार्यक्रमांची माहिती देण्यात येईल. त्यानंतर १ ते १० फेब्रुवारी या कालावधीत मंडळ स्तरावर सामूहिक भोजनाच्या माध्यमातून समाजबांधवांना एकत्र आणण्याचा प्रयत्न होईल. १२ फेब्रुवारीपासून ते २ मार्चपर्यंत व्यापक जनसंपर्क मोहीम चालविण्यात येणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, काँग्रेसने अनुसूचित जातींचा केवळ मतांसाठी वापर केला आहे. भाजपाने सौभाग्य योजनेद्वारे लोकांच्या घरोघरी वीज दिली. उज्ज्वला योजनेद्वारे गॅस जोडणी आणि शेगडी उपलब्ध करुन दिली. या योजनांचा सर्वाधिक लाभ अनुसूचित जातींमधील लोकांना झाला. २०२० पर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे इंदू मिल येथील स्मारक पूर्ण होईल, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.इंदू मिलची जागा काँग्रेसला हडपायची होती-मुख्यमंत्रीमुंबईतील इंदू मिलची जागा काँग्रेसला हडपायची होती, असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात भाजपाच्या विजय संकल्पसभेत केला. आपल्या बापाचे स्मारक उभे केले, पण संविधानाच्या बापाचे स्मारक उभारण्यासाठी पुढाकार घेतला नाही, शब्दांत फडणवीस यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.>मतदारांच्या घरावर भाजपाचा झेंडा !पुणे-आता मतदारांच्या घरावर भाजपाचा झेंडा लावण्याचा कार्यक्रम भाजपाने आखला आहे. ‘हमारा घर भाजपा का घर’ हा पक्षाचा मुख्य अजेंडा असून, जे मतदार भाजपाला मतदान करणार आहेत, ते आपल्या घरावर भाजपाचा झेंडा लावून पाठिंबा देतील. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी हा कार्यक्रम हाती घेतला जाईल, अशी माहिती केंद्रीय मानव संसाधनमंत्री प्रकाश जावडेकर यांनी पुणे येथे पत्रकार परिषदेत दिली.

टॅग्स :BJPभाजपा