भाजपाच्या टेकूने कल्याण डोंबिवलीत शिवसेनेचा भगवा फडकला
By Admin | Updated: November 11, 2015 13:31 IST2015-11-11T12:52:51+5:302015-11-11T13:31:04+5:30
कल्याण डोंबिवली महापालिकेत महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या राहुल दामले यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने शिवसेनेच्या राजेंद्र देवळेकर यांची महापौरपदी बिनविरोध निवड झाली आहे.

भाजपाच्या टेकूने कल्याण डोंबिवलीत शिवसेनेचा भगवा फडकला
ऑनलाइन लोकमत
कल्याण, दि. ११ - कल्याण डोंबिवली महापालिकेत महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या राहुल दामले यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने शिवसेनेच्या राजेंद्र देवळेकर यांची महापौरपदी बिनविरोध निवड झाली आहे. तर उपमहापौरपदी आता भाजपाच्या विक्रांत तरे यांची निवड झाली आहे.
कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत शिवसेना व भाजपा स्वबळावर लढले होते. शिवसेनेने १२२ पैकी ५२ जागांवर तर भाजपाने ४२ जागांवर विजय मिळवला होता. मॅजिक फिगर गाठण्यासाठी दोन्ही पक्षांना मनसे, अपक्ष व अन्य पक्षाच्या नगरसेवकांची मदत घ्यावी लागली असती. शिवसेना व भाजपाने महापौर व उपमहापौरपदासाठी स्वतंत्र अर्जही दाखल केले होते. अखेरीस शिवसेना व भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये बैठक पार पडली. या बैठकीत युतीचा निर्णय झाला होता. अपेक्षेप्रमाणे बुधवारी महापौरपदाच्या निवडणुकीपूर्वी भाजपाच्या राहुल दामले यांनी अर्ज मागे घेतला व महापालिकेवर पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा फडकला.